ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये 'विष्णु युगा'ची सुरुवात, नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ - नरेंद्र मोदी

Chhattisgarh CM : विष्णुदेव साय यांनी छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Chhattisgarh CM
Chhattisgarh CM
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 5:42 PM IST

शपथविधी सोहळा

रायपूर Chhattisgarh CM : विष्णुदेव साय यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. विष्णुदेव साय यांची रविवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. याशिवाय राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आदिवासी समाजाचे नेते : चार वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलेले विष्णुदेव साय हे आदिवासी समाजातून येतात. गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी रविवारी रायपूरमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांचं नाव पुढे केलं होतं. त्यानंतर ५४ नवनिर्वाचित आमदारांनी यावर सहमती दर्शवली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुनकुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. येथे त्यांनी ८७,६०४ मतं मिळवून काँग्रेसच्या यूडी मिंज यांचा पराभव केला आहे.

विष्णुदेव साय यांचा राजकीय प्रवास :

  • १९९० - बगिया ग्रामपंचायतीचे सरपंच
  • १९९० ते १९९८ - तपकरा विधानसभेचे आमदार (अविभाजित मध्य प्रदेश)
  • १९९९ - रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले
  • २००४ - रायगडमधून पुन्हा खासदार
  • २००६ - छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
  • २००९ - रायगडमधून तिसऱ्यांदा खासदार
  • २०११ - दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष
  • २०१४ - रायगडमधून चौथ्यांदा खासदार
  • २०१४ ते २०१९ - मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (पोलाद आणि खाण मंत्रालय)
  • २०२० ते २०२२ - तिसऱ्यांदा छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष
  • २०२२ - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य
  • २०२३ - राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य
  • २०२३ - कुनकुरी विधानसभेचे आमदार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अरुण साव यांचा राजकीय प्रवास : अरुण साव राजकारणात येण्यापूर्वी वकील होते. १९९० ते १९९५ पर्यंत ते अभाविपच्या मुंगेली युनिटचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले. १९९६ मध्ये ते भाजपा युवा मोर्चाचे मुंगेलीचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर ते भाजपाचे सरचिटणीस बनले. अरुण साव सुरुवातीपासूनच संघाशी जोडले होते. २००८ ते २०१३ पर्यंत त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलं. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते बिलासपूरमधून खासदार झाले. त्यानंतर २०२२ मध्ये ते छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनले.

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांचा राजकीय प्रवास : विजय शर्मा १९८९ ते १९९१ पर्यंत कवर्धा जिल्ह्यातील अभविपचे सह-संयोजक होते. यानंतर १९९३ ते १९९४ या काळात ते विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २००८ मध्ये ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष झाले. फेब्रुवारी २०१५ ते जानेवारी २०२० पर्यंत ते जिल्हा पंचायत सदस्याचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. २०१६ ते २०२० अशी चार वर्ष ते छत्तीसगड युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर २०२२ मध्ये ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस झाले. सध्या ते कवर्धा विधानसभेचे आमदार आहेत.

हे वाचलंत का :

  1. पडद्यामागं राहून काम करणारा नेता ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री, कोण आहेत विष्णुदेव साय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.