ETV Bharat / bharat

रायगड किल्ल्यावर झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, जाणून घ्या इतिहास

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din : दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक दिन १६ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या राज्याभिषेक दिनाचा इतिहास जाणून घेऊ.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 10:06 AM IST

हैदराबाद : छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर दुर्ग (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. छत्रपती संभाजी 2 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. जिजाबाईंनीच संभाजीमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली. 1680 मध्ये छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी सोयराबाई यांचा मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराजांना पन्हाळ्यात कैद करण्यात आले होते. राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी संभाजीला मिळताच त्याने पन्हाळ्याच्या किल्लेदाराला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला. 18 जून 1680 रोजी छत्रपती संभाजींनी रायगड किल्लाही ताब्यात घेतला. राजाराम, त्याची पत्नी जानकी आणि आई सोयराबाई यांना अटक करण्यात आली.

संभाजी राजेंचा राज्याभिषेक : छत्रपती संभाजी राजे 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले, परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. संभाजी राजे यांचा राज्याभिषेक त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण किल्ल्यावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व : 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांना मराठा साम्राज्याची गादी सोपवण्यात आली. हा दिवस मराठा साम्राज्यासाठी गौरवाचा दिवस आहे, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे यांनी संकटकाळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. वयाच्या 18 व्या वर्षी ते युवराज झाले. वयाच्या 23 व्या वर्षी ते छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले. त्यांचा जन्म १४ मे १६५७ आणि मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे झाला.

संभाजीला समजून घेण्यात औरंगजेबाने केली मोठी चूक : शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाला वाटले की आता रायगड किल्ला सहज काबीज करता येईल. त्यामुळे छत्रपती संभाजी सत्तेवर येताच औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला. पण छत्रपती संभाजींसोबतच्या लढाईत त्याचा दारुण पराभव झाला. यानंतरही छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या उदयासाठी मुघलांशी अनेक लढाया करून विजय मिळविला. छत्रपती संभाजी महाराजांनी कारकिर्दीत मुघलांव्यतिरिक्त गोवा, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांच्यातही अनेक लढाया केल्या.

छत्रपती संभाजी राजे यांचे शौर्य : संभाजी राजेंच्या शौर्याचं उदाहरण दिले जाते. कारण शेकडो मुघलांनी वेढले असतानाही त्यांनी कधीही शस्त्रे ठेवली नाहीत. औरंगजेबानं कपटाने संभाजी यांना मारण्याचा किंवा अटक करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण संभाजी राजे कधीच त्याच्या हाती लागले नाहीत. १६८९ मध्ये मराठा सैन्य आणि मुघल यांच्यात घनघोर युद्ध झाले. हे युद्धही मराठ्यांनी जिंकले. पण संभाजी राजेंच्या मेहुण्यानं मुघलांशी हातमिळवणी करून राजाला कपटानं अटक केली.

शारीरिक छळानंतर वेदनादायक मृत्यू : औरंगजेबानं संभाजीला इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव देत जीव वाचला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु जेव्हा संभाजी राजेंनी नकार दिला तेव्हा त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला. 11 मार्च 1689 रोजी संभाजींची हत्या करून त्यांचा मृतदेह तुळापूर, पुणे येथे फेकण्यात आला.

हेही वाचा :

  1. राष्ट्रीय युवा दिन 2024 : काय आहे राष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास, जाणून घ्या स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ; 'मैसूरच्या वाघा'नं बनवलेली 'राम लल्लां'ची मूर्ती, अयोध्येत होणार विराजमान
  3. मकर संक्रांती 2024; मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय ? जाणून घ्या शुभ काळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.