नवी दिल्ली - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल (2022)च्या 46 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करून हंगामातील तिसरा विजय नोंदवला. (Chennai Super Kings beat Sunrisers Hyderabad) धोनी कर्णधार झाल्याने सीएसकेचे नशीब उजळले आणि संघाने हैदराबादवर सहज विजय मिळवला. शनिवारी रवींद्र जडेजाने चेन्नईचा कर्णधार पदाचा कार्यभार महेंद्रसिंग धोनीकडे सोपवला. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २०२ धावांची मजल मारली. यासमोर हैदराबादचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 189 धावाच करू शकला. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
IPL 2022 मध्ये प्रथमच कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक गमावली. हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी १८२ धावा जोडून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. ( MS Dhoni Captain Chennai IPL Team ) आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यादरम्यान गायकवाडचे शतक एका धावेने हुकले. टी नटराजनने त्याला वैयक्तिक ९९ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
2011 नंतर धोनी पहिल्यांदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तो 9 धावा करून नटराजनचा बळी ठरला. कॉनवे शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 85 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भर घातली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात, मुकेश चौधरीने अभिषेकला वैयक्तिक 39 धावांवर बाद करून हैदराबादला पहिला धक्का दिला, पुढच्याच चेंडूवर त्याने फॉर्ममध्ये असलेल्या राहुल त्रिपाठीला गोल्डन डकवर बाद केले. या दोन धक्क्यांमधून हैदराबाद बाहेर पडू शकले नाही. कर्णधार केन विल्यमसनने 47 आणि पूरनने नाबाद 64 धावांची खेळी केली.
हैदराबाद संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर चेन्नईने दोन बदल केले आहेत. शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्होच्या जागी देवन कानवे आणि सिमरनजीत सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (सी), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन ही हैदराबातची प्लेईंग टीम आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Full Speech Aurangabad : राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सभेतील संपूर्ण भाषण जसेच्या तसे..