मुंबई - आयपीएलच्या चालू हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव केला. मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. ( Chennai Super Kings beat Delhi Capitals ) प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव 17.4 षटकांत 117 धावांवर आटोपला. 49 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी खेळणारा डेव्हॉन कॉनवे सामनावीर ठरला.
IPL-2022 च्या 55 व्या सामन्यात सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ( DY Patil Sports Stadium ) चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला.
दिल्ली कॅपिटल्सचा डाव 117 धावांवर आटोपला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने 91 धावांनी विजय मिळवला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यांच्याशिवाय शार्दुल ठाकूर (24), कर्णधार ऋषभ पंत (21) आणि डेव्हिड वॉर्नर (19) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. चेन्नईकडून मोईन अलीने 3 तर मुकेश चौधरी, सिमरजित सिंग आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 2 बळी घेतले. महेश ठेकणानेही 1 बळी घेतला.
117 धावांवर दिल्ली कॅपिटल्सची 9वी विकेट पडली, शार्दुल ठाकूर (24) ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर धोनीकरवी झेलबाद झाला. शार्दुलने ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 19 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला.
हेही वाचा - 'भारतात गुंतवणूक करा, फायद्यात राहाल'.. आदर पुनावाला यांचा एलन मस्कला सल्ला..