चेन्नई (तामिळनाडू) - हल्ली लग्नात विविध प्रकारची स्टंटबाजी केली जाते. तामिळनाडूतील वधू-वरांनी वेगळ्याच पद्धतीने लग्न केलं. या अनोख्या विवाह सोहळ्यात तामिळनाडूच्या एका जोडप्याने चेन्नईच्या किनाऱ्याजवळ 60 फूट खोल पाण्यात लग्न गाठ बांधली.
चिनादुराई आणि स्वेथा या दाम्पत्याने समुद्रातील 60 खोल पाण्यात पारंपारिक पद्धतीने लग्न केले. हा विवाह सोहळा हिंदू विधींने पार पाडला. लग्नाआधी, जोडप्याने स्कूबा डायव्हिंग आणि श्वासोच्छ्वास-नियंत्रणासाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते.