मेष - आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल.
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.
कर्क - आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.
सिंह - कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या - आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस प्रतिकूल आहे.
तूळ - आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.
वृश्चिक - आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
धनू - आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
मकर - आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून मात्र सावध राहावे लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे आनंदित व्हाल. आपल्या प्रतिष्ठेत भर पडेल.
कुंभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून काही चांगल्या बातम्या येतील. संततीची मात्र काळजी वाटेल.
मीन - आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्या पासून थोपवतील.