ETV Bharat / bharat

Chat GPT Interview : चॅट जीपीटीने घेतली दिग्गजांची मुलाखत, या प्रश्नांवर गोंधळले ऋषी सुनक आणि बिल गेट्स - एआय चॅटबोट

सध्या टेक विश्वात चॅट जीपीटीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नुकतीच चॅट जीपीटीने यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बील गेट्स यांची मुलाखत घेतली. यावेळी चॅट जीपीटीने या दोन्ही दिग्गजांना विविध प्रश्न विचारले. बिल गेट्स आणि ऋषी सुनक यांनीही या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

Chat GPT Interview
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 20, 2023, 10:09 AM IST

सॅन फ्रान्सिस्को : एआय चॅटबोट चॅट जीपीटी सध्या टेक विश्वात चांगलीच खळबळ उडवत आहे. चॅट जीपीटीने यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतचा व्हिडिओ लिंक्डवर बिल गेट्सने शेअर केला आहे. ऋषी सुनक आणि माझी चॅटबोटने मुलाखत घेतली. या मुलाखतीत चॅटबोटने भविष्याबाबत आम्हाला खूप सारे प्रश्न विचारले. चॅट जीपीटीला उज्वल भविष्य असल्याची माहिती बिल गेटस यांनी यावेळी दिली.

काय होता चॅट जीपीटीचा पहिला प्रश्न : चॅटजीपीटीने ऋषी सुनक आणि बिल गेटस यांना या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या या प्रश्नांना या दोन्ही दिग्गजांनी दिलखुलास उत्तरे दिली. यात चॅट जीपीटीने या दोघांना कोणता पहिला प्रश्न विचारला याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र चॅट जीपीटीने 10 वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि बाजारावर तंत्रज्ञानाचा काय प्रभाव असेल याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर बिल गेट्सने यांनी आम्हाला अधिक कार्यक्षम होमे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आरोग्याची देखभाल आणि शिक्षणामध्ये कामगारांची कमी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी एआई चॅट जीपीटीसारखे तंत्रज्ञान आम्हाला अधिक मजबुत बनवण्यास मदत करणार असल्याचेही स्पष्ट केले.

चॅट जीपीटीच्या दुसऱ्या प्रश्नावर बिल गेट्सनी दिला सल्ला : आपल्या व्यवसायाच्या प्रारंभिक काळात वेळेवर येऊन वेळेवर परत जाणाऱ्या नागरिकांना काय सल्ला द्याल, असा सवाल चॅट जीपीटीने बिल गेट्स यांना विचारला होता. यावर बिल गेट्स यांनी मी साप्ताहिक सुट्टीवर विश्वास ठेवत नाही. माझी काम करण्याची शैली वेगळी आहे. तशीच बोलण्याची शैलीही वेगळी आहे. त्यामुळे माझा दृष्टीकोन खूप वेगळा होता. मात्र मायक्रोसॉफ्ट ग्रूप तेव्हा लहान होता, तेव्हा हे सगळे ठीक होते. जसे जसे आम्ही कुटुंबात अधिक नागरिकांना सामावून घेत गेलो, तेव्हा वेळेच्या बाबतीत आपण विचार करु लागतो. त्यामुळे आपण वेळेवर येऊन वेळेवर परत जाण्याचे आता पालन करू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही चॅट जीपीटीने व्यवसायात वेळेबाबतचा प्रश्न केला होता. त्यावर ऋषी सुनक यांनी मी स्थलांतरित कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी नेहमीच पुढे जाण्यासाठी काम केले आहे. मात्र कालांतराने मला वर्तमानात जगायचे हे कळले. त्यामुळे मी वेळेचे नियम पालन करत असल्याचेही स्पष्ट केले.

चॅट जीपीटीचा काय होता तिसरा प्रश्न : चॅट जीपीटीने बिल गेट्स यांना तुमच्या नोकरीतील असी कोणती खास गोष्ट आहे, जी चॅट जीपीटीने तुमच्यासाठी करावी असे तुम्हाला वाटते असे विचारले होते. यावर बिल गेट्स यांनी काही वेळा आपण नोट्स लिहतो. तेव्हा त्यांना स्मार्ट वर्क करण्यासाठी अशावेळी चॅट जीपीटीची मदत व्हावी. त्यासह गाणी, कविता आणि इतर कामे करण्यासाठी त्यांनी एआय चॅटजीपीटीचा वापर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Eye Test Through WhatsApp : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार डोळ्यांची तपासणी!, जाणून घ्या कशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.