ETV Bharat / bharat

Agniveer Recruitment Process : अग्निवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल, आता प्रथम ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार

author img

By

Published : Feb 5, 2023, 11:02 AM IST

सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नवीन भरती प्रक्रियेनुसार पहिली ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा (CEE) एप्रिलमध्ये होणार आहे.

Agniveer
अग्निवीर

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्याची घोषणा केली आहे. सैन्य दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता प्रथम ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील. या प्रक्रियेतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीच्या मध्यावर याबाबतची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

पहिली सीईई एप्रिलमध्ये : पहिली ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा एप्रिलमध्ये सुमारे २०० ठिकाणी होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बदललेल्या कार्यपद्धतीनुसार परिक्षेत नियोजितपणा आणण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहे. ऑनलाईन मोडमुळे परिक्षेचा देशभरात व्यापक प्रसार होईल आणि भरती रॅलींदरम्यान दिसणारी मोठी गर्दी कमी होईल. यामुळे भरती प्रक्रिया अधिक व्यवस्थापित आणि सुलभपणे आयोजित केली जाईल.

नवीन तीन चरणी भरती प्रक्रिया : एका अग्रगण्य वृत्तपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, भारतीय सैन्यात भरतीमध्ये परिवर्तनात्मक बदल करण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेसाठी नवीन तीन चरण पद्धतीची यादी दिली आहे. पहिली पायरी म्हणजे केंद्रांवर सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन सीईई, त्यानंतर भरती रॅलींदरम्यान सीईई पात्र उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या आणि शेवटी वैद्यकीय चाचण्या.

पुढील भरती चक्रापासून नवीन प्रक्रिया लागू : अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागायची. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी व्हायची. सीईईला उपस्थित राहणे ही शेवटची पायरी होती. परंतु आता, सामान्य ऑनलाइन सीईई ही पहिली पायरी करण्यात आली आहे. 2023-24 च्या पुढील भरती चक्रापासून सैन्यात भरती होण्यास इच्छुक असलेल्या सुमारे 40,000 उमेदवारांना नवीन प्रक्रिया लागू होईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करणार : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी राज्य सरकारद्वारा मान्य करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने याप्रकरणी पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारने विद्यार्थांची मागणी मान्य करत राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयोगाने अचानक आदेश काढून 2023 पासून राज्यसेवा परिक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे, असे म्हटले होते.

हेही वाचा : MPSC New Pattern 2025 Onwards : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन पॅटर्न 2025 पासून लागू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.