ETV Bharat / bharat

chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरनं आणखी केली कमाल, वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 10:55 PM IST

इस्रोनं विक्रम लँडरच्या रंगीत 3D प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. थ्रीडी चष्म्यातून पाहिल्यास अप्रतिम नजारा तुम्हाला पाहायला मिळेणार आहे. हा फोटो प्रज्ञान रोव्हरनं 49 फूट अंतरावरून आपल्या नवकॅमनं क्लिक केलाय.

chandrayaan 3
chandrayaan 3

बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे 3D चित्र प्रसिद्ध केलं आहे. हे चित्र पाहण्याची खरी मजा तुम्हाला थ्रीडी चष्म्यातून येईल, असंही सांगण्यात आलं आहे. वास्तविक, हे छायाचित्र काही दिवसांपूर्वी प्रज्ञान रोव्हरनं लँडरपासून 15 मीटर अंतरावर म्हणजेच सुमारे 40 फुटांवरून क्लिक केलं होतं.

  • Chandrayaan-3 Mission:

    Anaglyph is a simple visualization of the object or terrain in three dimensions from stereo or multi-view images.

    The Anaglyph presented here is created using NavCam Stereo Images, which consist of both a left and right image captured onboard the Pragyan… pic.twitter.com/T8ksnvrovA

    — ISRO (@isro) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

NavCam नं काढला फोटो : ISRO नं विक्रम लँडरच्या सभोवतालच्या पृष्ठभागाची स्टिरिओ, मल्टी-व्ह्यू प्रतिमांच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. इस्रोच्या भाषेत त्याला अॅनाग्लिफ म्हटलं जातं. हा फोटो प्रज्ञान रोव्हरच्या NavCam नं काढला आहे. नंतर Navcam Stereo मध्ये बदलण्यात आलाय.

दोन फोटोंचं संयोजन : हे ३ चॅनलचे चित्र आहे. हे प्रत्यक्षात दोन फोटोंचं संयोजन आहे. रेड चॅनलवर एक चित्र होतं. तर दुसरं ब्लू आणि ग्रीन चॅनेलवर होतं. दोन्ही एकत्र करून हे चित्र तयार झालं आहे. त्यामुळं प्रेक्षकांना विक्रम लँडर 3D मध्ये दिसणार आहे. हे चित्र पाहतांना तुम्हाला चंद्रावर उभं राहून विक्रमकडं बघत असल्याचा भास होईल.

रोव्हरचा आकार किती आहे? : चांद्रयान-3 रोव्हरचं एकूण वजन 26 किलो आहे. हे तीन फूट लांब, 2.5 फूट रुंद आणि 2.8 फूट उंच आहे. रोव्हरला एकुण सहा चाक आहेत. रोहर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान 500 मीटर म्हणजेच 1600 फूट जाऊ शकतो. त्याचा वेग 1 सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. जोपर्यंत त्याला सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळेत, तोपर्यंत रोव्हर पुढील 13 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर काम करत राहील.

दरम्यान, 'प्रज्ञान' रोव्हरच्या चंद्रावरील असाइनमेंट पूर्ण झाल्या असून, त्याला आता स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आलंय. चंद्रावर पुढील सूर्योदय झाल्यानंतर रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट होण्याची अपेक्षा इस्रोला आहे. त्यामुळं पुढील सूर्योदय होईपर्यंत आता वाट पाहावी लागणार आहे. (Chandrayaan ३ Rover)

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 update : विक्रमने पुन्हा चंद्रावर मारली 40 सेमी उंच उडी; केलं सॉफ्ट लँडिंग - इस्रो
  2. Aditya L1 mission : आदित्य एल1 उपग्रहाची काय आहे स्थिती? इस्रोनं दिली महत्त्वाची माहिती
  3. Chandrayaan ३ Rover : 'प्रज्ञान' रोव्हरचं चंद्रावरील कार्य पूर्ण, रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.