बंगळुरू : चंद्रयान 3 चंद्रावरील दक्षिण ध्रूवावर उतरण्यास सज्ज झालं आहे. उद्या सायंकाळी चंद्रयान 3 दक्षिण ध्रूवावर उतरण्याची शेवटची कसोटी पार करणं बाकी आहे. दक्षिण ध्रूवावर या अगोदर रशियाच्या 'लुना' हे यान क्रॅश झालं होतं. त्यामुळे दक्षिण ध्रूवावर 'विक्रम लँडर' उतरवणं खडतर असल्याचं स्पष्ट झालं. दक्षिण ध्रूवावर लँडर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्रयान 3 लँडर दक्षिण ध्रूवाच्या 69.37 ते 32.35 क्षेत्रात उतरवण्यात येणार आहे.
इस्रोनं का निवडलं दक्षिण ध्रूव ? : दक्षिण ध्रूवावर जलाशयाचा गोठलेले खूप साठा असल्याचा अंदाज इस्रोला आहे. त्यामुळेच इस्रोनं चंद्रयान 1 च्या माध्यमातून चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध जगापुढं ठेवला. दक्षिण ध्रूवाच्या प्रयोगाद्वारे आपली क्षमता वापरुन नवीन शोध लावण्याचं इस्रोचं उद्धिष्टं आहे. दक्षिण ध्रूवावर पाण्याचा साठा असल्याचं स्पष्ट झाल्यास इस्रोच्या शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांसाठी पाण्याचं इंधन म्हणून वापर करता येणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रूवावर खूप मोठे विवर आहेत. हे विवर खूप खोल असल्यानं त्यात सूर्यप्रकाश पोहोचणं खूप कठीण आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरच एटकीन बासील एप्सिलॉन हे शिखर आहे. त्यामुळे दक्षिण ध्रूवावरील मोहीम खूप आव्हानात्मक आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन इस्रोनं दक्षिण ध्रूवावर चंद्रयान 3 उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रयान 3 यशस्वी झाल्यास इस्रो ठरणार जगात अव्वल : नुकतचं रशियाचं 'लुना' हे लँडर चंद्रावर क्रॅश झालं आहे. त्यामुळे रशियासारख्या बलाढ्य देशालाही मोठा धक्का बसला. मात्र, 1976 नंतर केवळ चीनलाच चंद्रावर मोहीम यशस्वी करता आली आहे. इतर सगळ्या देशांच्या चंद्रमोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. चीननं 'चांगे 3 लँडर' चंद्रावर 2013 मध्ये उतरवलं होतं. तर 'चांगई 5' यानही चीननं 2015 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं आहे. त्यानंतर मात्र चंद्रावर लँडर उतरवणं कोणत्याही देशाला जमलं नाही. इस्रोनं बनवलेलं भारताचं चंद्रयान 2 चंद्रावर क्रॅश झालं होतं. त्यानंतर इस्रायलचं बेरेशीट, यूएईचं रशीद ही मोहीम देखील अयशस्वी झाली आहे. दुसरीकडं इस्रोला चंद्रयान 3 यशस्वी करण्यात यश आलं तर इस्रो जगात अव्वल ठरणार आहे. इस्रोनं आतापर्यंतचे सगळे टप्पे यशस्वी पार पाडले आहेत. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
हेही वाचा -