यादगिरी(कर्नाटक) : भारताची बहुप्रतिक्षित 'चंद्रयान 3' मोहीम यशस्वी झाला. विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानं देशात आनंदाचं वातावरण आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर काही तासांनी 'प्रज्ञान रोव्हर' लँडरमधून बाहेर आलं. सध्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावर शोध घेण्याचं काम सुरू केलं. संपूर्ण जगाचं लक्ष 'इस्रो'च्या चंद्रयान 3 मोहीमेकडं लागलं होतं. (Baby Name Vikram Pragyan) (Chandrayaan 3)
'चंद्रयान 3' वरून ठेवलं बाळाचं नाव : चंद्रावर उतरलेल्या या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार असणाऱ्या पालकांनी आपल्या नवजात बाळांची नावं 'विक्रम' आणि 'प्रज्ञान' अशी ठेवलीत. कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील वडगेरा गावात एकाच कुटुंबात जन्मलेल्या दोन बाळांची नावं 'चंद्रयान 3' च्या मोहीमेवरून ठेवण्यात आली. बाळाप्पा आणि नगम्मा दाम्पत्याच्या बाळाच नाव 'विक्रम' असं ठेवण्यात आलं, तर निंगाप्पा आणि शिवम्मा दाम्पत्याच्या बाळाच नाव 'प्रज्ञान' ठेवण्यात आलं. विक्रम नावाच्या बाळाचा जन्म 28 जून रोजी झाला असून, प्रज्ञान नावाच्या बाळाचा जन्म 14 ऑगस्ट रोजी झालाय. 24 ऑगस्ट रोजी या दोघांचा नामकरण सोहळा थाटामाटात पार पडलाय.
'इस्रो'बद्दल कृतज्ञता व्यक्त : याबाबत पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, भारताच्या 'चंद्रयान 3' च्या ऐतिहासिक यशानंतर आम्ही आमच्या बाळांची नावं ठेवण्याचा निर्णय घेतला. चंद्रयान 3 बद्दल, इस्रोबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांची नाव विक्रम तसेच प्रज्ञान ठेवलं आहे. या क्षणाला आम्ही कधीच विसरू शकरणार नाहीत.
चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग : 'चंद्रयान-3' ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. 'चंद्रयान' उतरल्यानंतर भारतानं अवकाश क्षेत्रात नवा इतिहास रचला. इस्रोनं जाहीर केलेल्या वेळेनुसार चंद्रयान संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं. बुधवारी (23 ऑगस्ट) याचा व्हिडिओ इस्रोने जारी केला होता.
हेही वाचा -