ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 Update: चांद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी इस्रो प्रमुखांनी तिरुपती मंदिरात केली प्रार्थना

इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी 'चांद्रयान 3' मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रक्षेपण करण्यापूर्वी सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरिणी मंदिरात प्रार्थना केली. आम्हाला आशा आहे की, सर्व काही ठीक होईल आणि ते 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरेल, असे ते पत्रकारांना म्हणाले आहेत.

Chandrayaan 3 Update
चांद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी इस्रो प्रमुखांनी तिरुपती मंदिरात केली प्रार्थना
author img

By

Published : Jul 14, 2023, 1:58 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी इस्रो प्रमुखांनी केली प्रार्थना

तिरुपती : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांनी 'चांद्रयान 3' मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या आधी गुरुवारी सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरिणी मंदिरात प्रार्थना केली. 'चांद्रयान 3' मोहीम आज दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाणार आहे. मला चेंगलम्मा देवीच्या आशीर्वादाची गरज आहे. मी या मिशनच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे, असे सोमनाथ यांनी पत्रकारांना सांगितले.

व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण : सोमनाथ यांच्या मते, इस्रोचे पुढील प्रक्षेपण वेळापत्रक हे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनच्या माध्यमातून जुलैच्या अखेरीस व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण असेल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली अंतराळ-आधारित मोहीम 'आदित्य-एल1' ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पुढे, इस्रोचे चेअरमन म्हणाले की उपग्रहाची सध्या चाचणी सुरू आहे. जर त्याचे परिणाम चांगले असतील तर प्रक्षेपण वेळापत्रकानुसार (10 ऑगस्ट) किंवा त्या तारखेच्या आसपास होईल.

मंदिराला भेट देण्याची परंपरा : इस्रोच्या अधिकार्‍यांनी मंदिराला भेट देणे ही परंपरा बनली आहे. दरम्यान, चेंगलम्मा मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांनी पीटीआयला सांगितले की, रॉकेट प्रक्षेपण करण्यापूर्वी इस्रोच्या अधिकार्‍यांसाठी मंदिराला भेट देण्याची परंपरा बनली आहे. रेड्डी म्हणाले, प्रत्येक रॉकेट प्रक्षेपणाच्या पूर्वसंध्येला उलटी गिनती सुरू होण्यापूर्वी, ते चेंगलम्मा मंदिरात प्रार्थना करतात. नंतर त्यांचे प्रक्षेपण कार्य सुरू करतात. या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या आधी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने गुरूवारी सकाळी जवळच्या तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली.

  • #WATCH | "This is Chandrayaan-3 --- our mission to the moon...We have a launch tomorrow," says the team of ISRO scientists after offering prayers at Tirupati Venkatachalapathy Temple in Andhra Pradesh. pic.twitter.com/xkQb1SuX4V

    — ANI (@ANI) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इस्रोच्या अधिकाऱ्यांची भेट : इस्रोच्या टीममध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. गुरुवारी सकाळी ते मंदिरात पोहोचल्याचे फोटो व्हायरल झाले. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्याने मंदिरात त्यांच्या आगमनाची पुष्टी केली होती. टीटीडीच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, इस्रोच्या टीमने तिरुमलाला भेट दिली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रोचे अधिकारी सहसा त्यांच्या मंदिराच्या भेटीची प्रसिद्धी करत नाहीत.

हेही वाचा :

  1. Chandrayaan 3 Launch : चांद्रयान ३ चे मोहिमेत सुरतच्या कंपनीने 'हे' दिले महत्त्वाचे योगदान
  2. Chandrayaan 3 launch Update: चांद्रयान-३ ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज, सतीश धवन स्पेसमधून घेणार झेप
  3. Chandrayaan 3 : भारत आज इतिहास घडवणार; जाणून घ्या चांद्रयान 2 पेक्षा चांद्रयान 3 मोहीम कशी आहे वेगळी, काय करण्यात आले अपग्रेड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.