ETV Bharat / bharat

Chandrababu Naidu News : अंतरिम जामीन मिळाल्यानंतर चंद्राबाबू नायडू विजयवाडाच्या निवासस्थानी दाखल, आंध्र सरकारवर केला हल्लाबोल - चंद्राबाबू नायडू

Chandrababu Naidu News : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज सकाळी विजयवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलंय.

एन चंद्राबाबू नायडू
एन चंद्राबाबू नायडू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 10:12 AM IST

विजयवाडा Chandrababu Naidu News : कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यावर एका दिवसानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी विजयवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या निवासस्थानाबाहेर पक्ष समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कथित कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नायडू राजमुंद्री तुरुंगातून आपल्या घरी परतले. चंद्राबाबू नायडू 53 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयानं त्यांना चार महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

काय म्हणाले चंद्राबाबू नायडू : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही सर्व रस्त्यावर येत माझ्यासाठी प्रार्थना केली होती. केवळ आंध्र प्रदेशच नाही तर तेलंगणा आणि इतर राज्यांतील लोकांकडून मला मिळालेलं प्रेम मी कधीही विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, माझ्या 45 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी कधीही चूक केली नाही. मी कोणालाही हे करू देणार नाही, असंही ते म्हणाले. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे आभार मानत असल्याचं त्यानी म्हटलंय. चंद्राबाबू नायडू यांना गुन्हेगार सिद्ध करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी YSRCP अपयशी ठरल्याचं टीडीपीनं म्हटलंय. पक्षानं म्हटलंय की, सत्ताधारी वायएसआरसीपीनं चंद्राबाबू नायडूंना दोषी सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, ते अयशस्वी झाले. यावरून वायएसआरसीपीला टीडीपीची भीती असल्याचं दिसून येते.

  • #WATCH | Former Andhra Pradesh CM and TDP Chief N Chandrababu Naidu arrives at his residence in Vijayawada, received by his supporters

    He walked out of Rajahmundry jail yesterday after Andhra Pradesh High Court granted him interim bail in the Skill Development Scam Case pic.twitter.com/feAsFhbohW

    — ANI (@ANI) November 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर : प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयानं चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूर केलाय. त्यांना 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य जामीन अर्जावर न्यायालय 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे. तसंच टीडीपी सुप्रिमोंना वैद्यकीय तपासणीशिवाय इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायकोर्टानं नायडू यांना कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी न होण्याचे आदेशही दिले आहेत. आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) 9 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यामुळं देशातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

आणखी दोन घोटाळ्यात नायडू आरोपी : कौशल्य विकास घोटाळा प्रकरणाव्यतिरिक्त नायडू हे फायबरनेट घोटाळा आणि इनर रिंगरोड घोटाळा या दोन अन्य कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. दरम्यान, आधीच्या सरकारनं दारू कंपन्यांना बेकायदेशीर परवाने दिल्याच्या आरोपांप्रकरणी आंध्र प्रदेश सीआयडीनं नायडू यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा :

  1. SC turns down ex AP CM : चंद्राबाबूंच्या याचिकेवर उद्या सुनावणी, एफआयआर रद्द करण्यासाठी तातडीची सुनावणी नाहीच
  2. Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची आंध्र प्रदेश सरकारला नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण
  3. FiberNet Scam Case : चंद्राबाबू नायडूंना 'सर्वोच्च' दिलासा; या तारखेपर्यंत अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.