मुंबई : भारताच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 4 दिवसांत विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच, आज आणि उद्या (12 आणि 13 जुलै रोजी) या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
Current district & station Nowcast warnings at 1730 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/94ZmlCaSoP
">Current district & station Nowcast warnings at 1730 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/94ZmlCaSoPCurrent district & station Nowcast warnings at 1730 IST today. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023
https://t.co/o69UesXdXb
https://t.co/Tx4GDKCKv4
If you observe any weather, kindly report it at:
https://t.co/5Mp3RJYA2y pic.twitter.com/94ZmlCaSoP
24 तासांसाठी 'रेड', 'ऑरेंज' अलर्ट जारी : भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांसाठी 'रेड', 'ऑरेंज' अलर्ट जारी केले आहेत. तसेच उत्तराखंडसाठी, आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. ज्यात राज्य तसेच लगतच्या उत्तर प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा धोका लक्षात घेता हवामान विभागाने 'पूर', 'भूस्खलन'चा इशाराही जारी केला आहे.
-
Reduction in rainfall over Himachal Pradesh, Punjab and Haryana & Chandigarh from today, the 11th July 2023.#weatherupdate #weatheralert #monsoon2023 #monsoonseason @moesgoi @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia pic.twitter.com/6KUQLfBU6g
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Reduction in rainfall over Himachal Pradesh, Punjab and Haryana & Chandigarh from today, the 11th July 2023.#weatherupdate #weatheralert #monsoon2023 #monsoonseason @moesgoi @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia pic.twitter.com/6KUQLfBU6g
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023Reduction in rainfall over Himachal Pradesh, Punjab and Haryana & Chandigarh from today, the 11th July 2023.#weatherupdate #weatheralert #monsoon2023 #monsoonseason @moesgoi @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia pic.twitter.com/6KUQLfBU6g
— India Meteorological Department (@Indiametdept) July 11, 2023
देशभरात पावसाची सामान्य स्थिती : त्याचवेळी, आजपासून उत्तराखंड आणि त्याच्या लगतच्या पश्चिम उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्येही पावसात लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आज, उद्या म्हणजेच 13 जुलैपर्यंत पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, झारखंड वगळता देशभरात पावसाची सामान्य स्थिती राहण्याची शक्याता आहे. ओडिशात पुढील 3 दिवसात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज : पुढील 4 दिवसांत उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. IMD ने देखील राज्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व आणि लगतचा ईशान्य भारत : पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. पुढील 2 दिवसांत मणिपूर आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज IMD विभागाने वर्तवला आहे. 14 ते 15 जुलै रोजी ओडिशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस : यासोबतच 12 ते 14 जुलै दरम्यान झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि उप-हिमालयीन प्रदेशांमध्ये वेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच आज पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
मध्य भारत : पुढील 4 दिवसांत मध्य प्रदेश आणि विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच, आज आणि उद्या (12 आणि 13 जुलै रोजी) या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारत : कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत विशेषतः 14 आणि 15 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारत : आज किनारपट्टीवरील कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ तसेच किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकात 14 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Amravati Rain: अमरावती जिल्ह्यात सलग तीस तासांपासून पाऊस सुरू; नदी नाल्यांना आला पूर