ETV Bharat / bharat

Red Fort Name Change : लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला करा; हिंदू महासभेची मागणी

शहरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या नामांतराची प्रक्रिया देशात सातत्याने सुरू आहे. दरम्यान, देशातील अनेक मोठ्या ऐतिहासिक वारसा स्थळांची नावे बदलण्याची मागणी होत आहे. ताजमहालचे नाव बदलून तेजो महालय ठेवण्याची मागणी या आधीही करण्यात आली होती. आता दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वामी चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

author img

By

Published : Apr 10, 2023, 7:58 PM IST

Red Fort Name Change
लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला

भोपाळ (मध्य प्रदेश) : देशभरातील विविध शहरांचे नाव बदलण्यात आल्यानंतर आता लाल किल्याचे देखील नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. लाल किल्ल्याचे नाव भगवा किल्ला ठेवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने ही मागणी केली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संबंधी पत्र लिहिले आहे. या पत्रातून स्वामी चक्रपाणी यांनी लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला करण्याची मागणी केली आहे.

लाल किल्ल्याचे नाव होते लाल कोट : अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लाल किल्ल्याचे पूर्वीचे नाव लाल कोट होते. त्यांच्या मते, हे हिंदू राजा अनंगपाल तोमर याने 1060 मध्ये बांधले होते. ते अभिमन्यूचे वंशज आणि महान हिंदू वीर पृथ्वीराज सिंह चौहान यांचे आजोबा होते. परंतु परदेशी लुटारू मुघलांनी त्यांना पकडले. महाराज चक्रपाणी यांनी पत्रात असे लिहिले आहे की, शाहजहानने 1638 मध्ये लाल किल्ला बांधला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. काही भंपक इतिहासकारांनी हा भ्रामक प्रचार केला आहे. महाराजांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे मुघलांनी राममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी, काशी विश्वनाथ मंदिर इत्यादींवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मशिदी बांधल्या, त्याचप्रमाणे आपल्या अनेक महापुरुषांनी बांधलेल्या मंदिरांवर दरबारी इतिहासकारांनी संभ्रम निर्माण केला आहे.

पंतप्रधानांना नाव बदलण्याचे आवाहन : चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, ज्या पद्धतीने तुम्ही मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान केले आहे, एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघलांचा काळा इतिहास काढून टाकण्याचे काम करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला करण्यात यावे, जेणेकरून देश आणि जगाला संदेश जाईल की हा किल्ला मुघल किंवा परकीय लुटारूंनी बांधलेला किल्ला नसून तो आपल्या देशातील महान हिंदू सनातनी राजांनी बांधलेला आहे.

मंगळवारची सुट्टी असावी : देशात पहिले हिंदू कॅलेंडर लागू करून रविवारऐवजी मंगळवारला साप्ताहिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी देखील अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. यासोबतच हिंदू कॅलेंडरही लागू करण्यात यावे, जेणेकरून मुलांना हिंदू तारखांची पूर्ण माहिती होईल, अशी मागणी महासभेच्या एका कार्यकर्त्याने केली आहे.

हेही वाचा : Kajal Hindustani Arrested : रामनवमीच्या सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी काजल हिंदुस्थानीची तुरुंगात रवानगी, कोण आहे ती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.