ETV Bharat / bharat

देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ, केंद्रानं राज्यांना जारी केली अ‍ॅडव्हायजरी

Covid 19 : केंद्र सरकारनं कोविड १९ च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यांना एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. केंद्रानं राज्यांना जिल्हावार अहवाल देण्याचं आवाहन केलं आहे.

Covid 19
Covid 19
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 10:50 PM IST

नवी दिल्ली Covid 19 : काही राज्यांमध्ये कोविड १९ प्रकरणांमध्ये नुकतीच झालेली वाढ आणि कोविडच्या जेएन. १ आजाराची पहिली केस आढळून आल्यानंतर, केंद्रानं सोमवारी राज्यांना एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली.

जिल्हावार अहवाल देण्याचं आवाहन : केंद्रानं राज्यांना कोविड परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचं आणि इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमणावर नियमितपणे जिल्हावार अहवाल देण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र पाठवून ही बाब हायलाइट केली. आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात आरोग्य सचिवांनी अधोरेखित केलं की, COVID - 19 विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी त्याची गती रोखणं महत्त्वाचं आहे.

कोविड १९ प्रकरणांमध्ये किंचित वाढ : अलीकडेच केरळसारख्या काही राज्यांमध्ये कोविड - १९ प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. भारतात कोविड १९ च्या JN.1 या उप प्रकाराचं पहिलं प्रकरण ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवलं गेलंय. ते म्हणाले की, आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन, रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी राज्यांनी आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि इतर व्यवस्था करणं आवश्यक आहे.

नियमितपणे अहवाल देण्याच्या सूचना : पंत यांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हावार प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणं लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांमध्ये नियमितपणे अहवाल देण्यास सांगितलं आहे. राज्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चाचणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुरेशी चाचणी सुनिश्चित करण्यासाठी आणि RT-PCR आणि प्रतिजन चाचणीचा शिफारस केलेला हिस्सा कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचलंत का :

  1. सावधान! 'तो' पुन्हा येतोय, केरळमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तामिळनाडूसह कर्नाटकमध्ये अलर्ट
  2. चीनमधील 'गूढ' आजारानंतर केंद्र सरकार अलर्टवर, वाचा तज्ज्ञांचं मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.