ETV Bharat / bharat

Central Excise Day : केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या सविस्तर - केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क मंडळ

दरवर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिन' म्हणजेच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक विकासात केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क मंडळाच्या योगदानाचा गौरव करणे, असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

Central Excise Day
केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
author img

By

Published : Feb 12, 2023, 2:09 PM IST

Updated : Feb 24, 2023, 7:23 AM IST

हैद्राबाद : दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी देशात 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिन' साजरा केला जातो. केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क मंडळाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचा गौरव करणे हा, हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. याशिवाय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचा गौरव करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. याद्वारे करप्रणालीबाबतही लोकांना जागरूक केले जाते. 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू करण्यात आला. यानिमित्ताने 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिन' साजरा केला जातो. देशाच्या औद्योगिक विकासात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. करप्रणाली सुधारून कर भरणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी अनेक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.

का साजरा केला जातो : 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू झाल्यामुळे दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा केला जातो. सेंट्रल बोर्ड ऑफ कस्टम्स अँड एक्साइज केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिना'च्या दिवशी, CBEC द्वारे प्रदान केलेल्या सेवा आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांचा गौरव केला जातो. या दरम्यान संपूर्ण प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि भविष्यात त्यांना प्रेरणा देण्यासाठी या दिवशी त्यांचा सन्मान केला जातो. या विभागाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दरवर्षी उत्पादन क्षेत्रातील वस्तूंमधील भ्रष्टाचाराची चौकशी करतात.

'हा' कर कश्यावर लावला जातो : केंद्रीय सीमाशुल्क आणि अबकारी मंडळ केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडे देशातील सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि अंमली पदार्थांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या सर्व उत्पादनांवर लादला जातो. उत्पादन शुल्क विभागाची स्थापना 1855 मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली. देशाच्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश उत्पन्न उत्पादन शुल्कातून येते. मात्र, 1944 पासून विविध प्रकारच्या सेवांनाही कर श्रेणीत ठेवण्यात आले आहे. देशातील जनतेला या संस्थेची माहिती देण्यासाठी केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क दिन साजरा केला जातो. याशिवाय या संस्थेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा : Direct Tax Collection Increased: पैसेच पैसे.. देशातील प्रत्यक्ष कर संकलनात 24 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत 15 लाख कोटींची बक्कळ कमाई..

Last Updated : Feb 24, 2023, 7:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.