ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सीडीएस बिपिन रावत यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया - india ready

अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यानंतर तालिबान सत्तेत येण्याचा अंदाज होता. मात्र, बदललेल्या टाईमलाईनने आश्चर्यचकित केले आहे. मात्र, 20 वर्षापूर्वी असलेलाच हा तालिबान असल्याचे सीडीएस बिपिन रावत यांनी सांगितले.

सीडीएस बिपिन रावत
सीडीएस बिपिन रावत
author img

By

Published : Aug 25, 2021, 6:14 PM IST

हैदराबाद - सीडीएस बिपिन रावत यांनी अफगाणिस्तानमधील स्थितीवर भारत-अमेरिका भागीदारी 21 व्या शतकातील सुरक्षा कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये जे काही घडले आहे, त्याचा अंदाज केला होता. मात्र, ते अचानक घडले आहे.

सीडीएस बिपिन रावत म्हणाले, की तालिबानची सत्ता येणार असल्याचा आम्ही अंदाज केला होता. त्यासाठी आम्ही योजनाही तयार केली होती. हे पूर्वीेचेच तालिबान आहे, केवळ त्यांचे सहकारी बदलले आहेत. तालिबानमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दहशतवादाच्या प्रश्नाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. माध्यमातील वृत्त आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या प्रवाशांमुळे तालिबानी कशा प्रकारे हालचाली करत आहेत, हे समजत आहेत.

हेही वाचा-दिल्ली दंगल: अनुराग ठाकूर यांच्यासह कपील मिश्रावर आरोपपत्र दाखल करण्याची आरोपीची मागणी

तालिबानींच्या टाईमलाईनने केले चकित

अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यानंतर तालिबान सत्तेत येण्याचा अंदाज होता. मात्र, बदललेल्या टाईमलाईनने आश्चर्यचकित केले आहे. मात्र, 20 वर्षापूर्वी असलेलाच हा तालिबान आहे. अफगाणिस्तानमधील दहशतावी कारवाया भारतामध्ये कशा पद्धतीने पसरविल्या जातील, याची आम्हाला चिंता होता. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे.

भारत-अमेरिका भागीदारावरील चर्चेत बिपिन रावत म्हणाले, की हिंद-प्रशांत आणि अफगाणिस्तानमधील स्थितीकडे एका दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये वेगवेगळी आव्हाने आहेत. तसेच दोन्ही क्षेत्रात परिस्थिती भिन्न आहे. जसे दोन समांतर रेषा एकत्रित येणे शक्य नाही. तसेच अफगाणिस्तान आणि हिंद-प्रशांतचे दोन्ही मुद्दे एकत्रित केले जाऊ शकत नाहीत.

हेही वाचा-अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांना ओळखणेही झाले कठीण; जर्मनीत सुरू केले पिझ्झा डिलिव्हरीचे काम

भारताकडून स्वत:ची रणनीती विकसित

सीडीएस बिपिन रावत म्हणाले, की दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गोपनीय माहिती मिळत असेल तर त्याचे स्वागत आहे. भारताच्या शेजारी आण्विक शस्त्र असलेले दोन शेजारी देश आहेत.त्यामुळे या क्षेत्रातील स्थितीने आम्ही चिंतेत आहोत. आम्ही स्वत:ची रणनीती विकसित करत आहोत. शेजारी देशांची काय इच्छा आहे, त्यावर सतत अभ्यास सुरू आहे. आम्ही अधिक क्षमता विकसित करत आहोत. परंपरागत पद्धतीने आपण खूप मजबूत आहोत. परंपरागत ताकदीने विरोधींचा मुकाबला करण्यास आपण सक्षम आहोत.

हेही वाचा-उसाला मिळणार आजपर्यंतचा सर्वाधिक हमीभाव; प्रति क्विंटल 290 रुपये एफआरपीची केंद्राकडून घोषणा

भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न -

अफगाणिस्तानच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या भारताच्या नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष अफगाणिस्तान 24 तास काम करीत आहेत. सुमारे सव्वाशे हिंदू-शीख कुटुंबांनी काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.