ETV Bharat / bharat

'संरक्षण उत्पादनात भारत लवकरच होणार आत्मनिर्भर' - National Defence College news

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाला संबोधित केले. यावेळी आत्मनिर्भर भारत, भारत-चीन संबंध आणि पाकिस्तानवर भाष्य केले.

रावत
रावत
author img

By

Published : Nov 6, 2020, 2:15 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी संबोधित केले. देशाच्या संरक्षण उद्योगामध्ये वेगाने वाढ होत आहे. सरंक्षण उद्योगामध्ये भारत आत्मनिर्भर होत असून येत्या काळात सर्व उपकरणे भारतातच तयार होतील, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले.

जनरल बिपिन रावत यांनी राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाला संबोधीत केले

भारत-चीन सीमेवर तणाव आहे. तर सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात असून एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर पडण्यास असमर्थ आहे. कट्टरवाद आणि अंतर्गत संघर्ष पाकिस्तानला अस्थिरतेकडे ढकलत आहे, असे ते म्हणाले. तसेच सीमेवर निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

संरक्षण उत्पादनात भारत स्वावलंबी -

शस्त्रास्त्र आयातीत दुसर्‍या क्रमांकावर असलेला भारत निर्यातदारांच्या यादीत मात्र 23व्या क्रमांकावर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने डिफेन्स प्रॉडक्शन अँड एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसी 2020 मसुदा जाहीर केला आहे. लष्करी क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी उच्च गुणवत्तेच्या संरक्षण उपकरणांच्या निर्मितीवर केंद्राने विशेष भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.