नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Gen Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमामात (Last Rites with full military honours) अंत्यसंस्कार (General Bipin Rawat last rites ) करण्यात आले. यावेळी लष्कराकडून रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. दिल्लीतील ब्रार स्क्वायर (Barar Square) स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस जनरल बिपिन रावत (Gen Bipin Rawat) यांच्या पार्थिवाला त्यांची मोठी मुलगी कृतिका हिने तर मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला छोटी मुलगी तारिणी हिने मुखाग्नि दिली. यावेळी त्यांना 17 तोपांची सलामी देण्यात आली तर 800 जवान उपस्थित होते. यावेळी रावत यांचे कुटूंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम संस्कारापूर्वी तिन्ही संरक्षण दलांनी त्यांची धून वाजवली तर लष्कराच्या बँडने शोक गीत सादर केले. अंतिम दर्शन स्थळावर 12 ब्रिगेडियर स्तराचे अधिकारी तैनात होते. अंत्ययात्रेत 99 सैनिकांनी एस्कॉर्ट केले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी पार्थिव नेणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव केला. नागरिकांनी 'जब तक सूरज चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा' असी नारेबाजी केली.
जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शरीर को आज बेस हॉस्पिटलमधून त्यांच्या सरकारी निवासस्थानी आणण्यात आले. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह अन्य अनेक दिग्गजांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचबरोबर जनरल बिपिन रावत यांना लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे, वायुसेना चीफ व्ही.आर. चौधरी आणि नौसेना प्रमुख अॅडमिरल आर. हरि कुमार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एन.वी. रमना यांनीही अंतिम दर्शन घेतले. रावत यांना अंतिम निरोप (General Bipin Rawat last rites ) देण्यासाठी अनेक मंत्री व मान्यवरांची रांग लागली होती.
तामिळनाडुमधील कुन्नूरजवळ बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Bipin Rawat chopper crash) भारताचे पहिले संरक्षण अध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत व 11 अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. सर्वांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणण्यात आले. पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी CDS जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल एस लिद्दर व 10 अन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आदि अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. जनरल रावत यांची अंत्यरात्रा दिल्लीतील सरकार पटेल मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी खासदार मनोज तिवारी आपल्या शेकडो समर्थकांसह रावत यांना आदरांजली देण्यासाठी रस्त्याकडेला थांबले होते. नागरिक हातात तिंरगा ध्वज व रावत तसेच त्यांच्या पत्नीचे फोटो घेऊन पार्थिव नेणाऱ्या वाहनावर फुले टाकत होते. अंत्ययात्रेवेळी सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले होते व दोन्ही बाजूचू वाहतूक सुरळीत सुरू होती.