मुंबई - सी. डी. देशमुख यांचा जन्म (14 जानेवारी) मकर संक्रातीच्या दिवशी कोकणात रायगड जिल्ह्यातील नाते या छोट्याशा गावात झाला. देशमुख यांची सुरुवातीपासून बुद्धी तेज होती. त्याच बुद्धीच्या बळावर त्यांनी इंग्लंडला जाऊन स्वातंत्र्यपूर्व काळात 'आयसीएस' परीक्षेत त्यांनी अव्वल क्रमांक मिळवला. (C.D Deshmukh India got its first Indian governor ) पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्या गेलेल्या लढ्यात चिंतामणरावांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देऊन हा लढा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. (Remembering CD Deshmukh) त्यामुळे पुढे मुंबईसह नव्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. (C.D Deshmukh Birth Anniversary) दरम्यान, पुढच्या काळात देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या पायाभरणीत सी. डी. देशमुख यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. (Reserve Bank of India its first Indian governor) स्वातंत्र्यानंतर देशातील आर्थिक आणि प्रशासकीय, तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.
रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर
सी. डी. देशमुखांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास 21 वर्षीची होती. मध्य प्रांतात त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली. या पदांवर काम करणारे ते सर्वात तरुण ICS होते. (History of CD Deshmukh) या कार्यकाळात सी. डी. देशमुख यांना काही महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार होता आले. 1931 साली महात्मा गांधीजींनी सहभाग घेतलेल्या लंडनमधील गोलमेज परिषदेचे काम सी. डी. देशमुखांनी सचिव या नात्याने केले होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली
त्यानंतर पुढे 1939 च्या जुलैमध्ये सी. डी. देशमुखांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. नंतर अवघ्या तीनच महिन्यात त्यांची बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. तर त्यानंतर, दोनच वर्षात म्हणजे 1941 साली मणिलाल नानावटी यांच्या जागी सी. डी. देशमुख रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला
1943 साली जेम्स टेलर यांचे निधन झाले. सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेत पाऊल ठेवले तेव्हा हे जेम्स टेलर गव्हर्नर होते. जेम्स टेलर यांच्या निधनानंतर रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला, तो सी. डी. देशमुखांच्या रुपाने. 11 ऑगस्ट 1943 रोजी सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. त्याच्या पुढच्याच वर्षी सीडींना भारताच्या व्हॉईसरॉयमार्फत 'नाईटहूड' (Knighthood) बहुमान देण्यात आला. 'सर' संबोधनाला पात्र ठरवणारा हा सन्मान आहे.
रिझर्व्ह बँकेतली सी. डी. देशमुखांची कारकीर्द 10 वर्षी होती
आरबीआयची स्थापना 1935 साली झाली आहे. म्हणजे, सी. डी. देशमुख गव्हर्नर झाले तेव्हा या संस्थेचे वय होते केवळ आठ वर्षे. वाढत्या वयातील ही संस्था अपरिपक्व राहू नये म्हणून सीडींनी मोठे काम केले. दरम्यान, याच काळात दुसऱ्या महायुद्धाचे चटके अर्थव्यवस्थेला बसत होते. युद्धोत्तर मंदीमुळे भारतीय मालाची मागणी घटत होती. परिणामी, परकीय चलनावर परिणाम होण्याची शक्यता होती. अशा काळात सी. डी. देशमुखांच्या नेतृत्त्वाने अर्थव्यवस्थेला वाचवले. रिझर्व्ह बँकेतली सी. डी. देशमुखांची कारकीर्द 10 वर्षी होती. 1939 साली ते आरबीआयमध्ये आले आणि 30 जून 1949 रोजी त्यांनी राजीनामा दिला.
मुंबईसाठी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा
1952 साली सी. डी. देशमुखांनी कुलाबा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांचा विजय झाला. शेकापतर्फे भाऊसाहेब राऊत यांनी त्यांना आव्हान दिले होते. मात्र, या निवडणुकीपूर्वीच नेहरूंनी सीडींना मंत्रिमंडळात घेतले होते आणि अर्थमंत्रिपदी नियुक्त केले होते. मात्र, मंत्रिमंडळात सर्व लोकनियुक्त मंत्री असावेत, असा नेहरूंचा आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी सीडींना निवडणूक लढण्यास सांगितले. दरम्यान, यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सीडी हे काँग्रेसचे सदस्य नव्हते. स्वतंत्र लढण्यास ते इच्छुक होते. मात्र, तसे झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते उघडपणे समर्थन करण्याची शक्यता नसल्याचे नेहरूंनी सांगितले. मात्र, तरीही ते ठाम राहिले, लढले आणि जिंकलेही.
भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून सीडी नाराज झाले
जेव्हा अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा पंतप्रधानांव्यतिरिक्त कुणाला स्पष्टीकरण देण्याचे बंधन त्यांच्यावर राहिले नाही. काँग्रेस पक्षाशी जोडले नसल्याने त्यांच्याकडे कुठलेच स्पष्टीकरण मागण्यात आले नाही. भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून सीडी नाराज झाले. पुढे त्याचे पर्यावसन राजीनाम्यात झाले. याबाबत त्यांनी नेहरू मेमोरियलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली होती. मुंबई शहराला स्वतंत्र दर्जा देण्याची कल्पना त्यांना पटली नाही. तसेच, मुंबईमध्ये शासनाने केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्यास नकार देणे हे लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे, अस म्हणत सी. डी. देशमुखांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
लढवय्या देश सेवकाचे 2 ऑक्टोबर 1982 रोजी हैदराबादमध्ये निधन झाले
आपल्यावर आपल्या बुद्धीमत्येच्या बेरीज-वजाबाकीनुसार जबाबदारी मिळते. मात्र, कित्येकजण असतात ज्यांच्या बुद्धीचा आवाका दिल्या जाणाऱ्या पदापेक्षा, जबाबदारीपेक्षा कायम मोठाच असतो. त्यातील हे एक सा.डी देशमुख. अशा या कर्तबगार आणि देशासाठी समरसून सेवा करणाऱ्या लढवय्या देश सेवकाचे 2 ऑक्टोबर 1982 रोजी हैदराबादमध्ये निधन झाले.
हेही वाचा - १७ वर्षांचा लढा, अनेकांनी गमावले प्राण, अन् झाला नामविस्तार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ'