ETV Bharat / bharat

CBSE Term 2 Exam Date : सीबीएसई दहावी आणि बारावी परीक्षेच्या दुसऱ्या सत्राची डेटशीट जारी, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई ( CBSE Term 2 Exam Date ) दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून घेतली जाणार आहे.

CBSE Term 2 Exam Date
सीबीएसई
author img

By

Published : Feb 9, 2022, 7:54 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. एक नोटीस जारी करून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून घेतली जाणार आहे. याचे डेटशीट ( CBSE Term 2 Exam Datesheet ) अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

  • Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the term-2 board exams for Class 10 and 12 in offline mode from April 26, 2022 pic.twitter.com/ricRahVNYR

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसऱ्या सत्राच्या परीक्षा उर्वरित 50 टक्के अभ्यासक्रमासाठी घेतली जाईल. सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

CBSE इयत्ता 10वी पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. तर इयत्ता 12वीची परीक्षा 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

पहिल्या सत्राचा निकाल कधी?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 1 च्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यार्थी त्यांचा निकाल CBSE cbse.gov.in, cbse.nic.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पार पडल्यानंतर निकाल जाहीर होतील.

निकाल पाहण्याची प्रक्रिया -

  • प्रथम निकाल पाहण्यासाठी CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
  • यानंतर CBSE निकाल 2021-22 या लिंकवर क्लिक करा.
  • आता रोल नंबर आणि मागितलेला तपशील भरा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला निकाल दिसेल.
  • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.