नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 14 फेब्रुवारीला सीबीएसई सीटीईटी उत्तर पत्रिका (CBSE CTET Answer Key) जारी केली. उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वरून ही उत्तर पत्रिका डाउनलोड करू शकतात. उमेदवार या उत्तर पत्रिकेवर 17 फेब्रुवारी पर्यंत आपला आक्षेप नोंदवू शकतात. 28 डिसेंबर 2022 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत झालेल्या या परीक्षांसाठीची ही उत्तरपत्रिका आहे. उमेदवारांनी प्रयत्न केलेल्या प्रश्नपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत.
प्रति प्रश्न 1000 रुपये अव्हान फी : आपत्ती विंडो 14 फेब्रुवारी रोजी उघडण्यात आली असून ती 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत खुली राहील. सीबीएसई सीटीईटीच्या अधिकृत साइटद्वारे उमेदवार उत्तर पत्रिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. ईमेल/पोस्ट किंवा वैयक्तिकरित्या सबमिट केलेली आव्हाने स्वीकारली जाणार नाहीत. आव्हान फी प्रति प्रश्न 1000 रुपये असून ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे 17 फेब्रुवारीपर्यंत जमा करावयाची आहे.
उत्तर पत्रिका डाउनलोड करण्याच्या स्टेप्स : उत्तर पत्रिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवार पुढे दिलेल्या या सोप्या स्टेप्सचे पालन करू शकतात. (1) सीबीएसई सीटीईटीच्या अधिकृत साइट ctet.nic.in वर भेट द्या. (2) मुख्यपृष्ठावर दिसत असलेल्या CTET Answer Key 2022 लिंकवर क्लिक करा. (3) तुमचा लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा. (4) तुमची उत्तर पत्रिका स्क्रीनवर प्रदर्शित होईल. (5) उत्तर पत्रिका तपासा आणि डाउनलोड करा. (6) पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल : भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्याची घोषणा केली आहे. सैन्य दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता प्रथम ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील. अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागायची. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी व्हायची. सीईईला उपस्थित राहणे ही शेवटची पायरी होती. परंतु आता, सामान्य ऑनलाइन सीईई ही पहिली पायरी करण्यात आली आहे. 2023-24 च्या पुढील भरती चक्रापासून सैन्यात भरती होण्यास इच्छुक असलेल्या सुमारे 40,000 उमेदवारांना नवीन प्रक्रिया लागू होईल. पहिली ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा एप्रिलमध्ये सुमारे २०० ठिकाणी होणार आहे.