नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावर्षी सुमारे 16.9 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. बारावीचे विद्यार्थी सीबीएसईच्या results.cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. सीबीएसईचा 87.33 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी सीबीएसई परीक्षेसाठी एकूण 38,83,710 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये दहावीमध्ये 21,86,940 विद्यार्थी आणि बारावीमध्ये 16,96,770 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
असा पाहू शकता निकाल- सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल तपासताना, तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील योग्यरित्या असल्याची खात्री करा. तुमचे गुण तपासण्यासाठी एकापेक्षा जास्त टूल्स वापरणे टाळा. कारण त्यामुळे तुमच्या चुका होऊ शकतात. तसेच, कोणताही गोंधळ टाळण्यासाठी हॉल तिकीट जवळ ठेवा. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर आणि उमंग अॅप सारखे इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील पाहू शकतात. बोर्डाने अलीकडेच डिजीलॉकरसाठी सुरक्षा पिन संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शाळांना सुरक्षा पिन उमेदवारांसह सामायिक करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांना या पिनसह त्यांचे डिजिलॉकर खाते तयार करावे लागणार आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या डिजीलॉकर खात्यांसाठी त्यांच्या डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता वाढवण्यासाठी 6 अंकी सुरक्षा पिन जारी केली आहे.
- तुमचे सीबीएसई डिजीलॉकर खाते सक्रिय करण्यासाठी, https://cbseservices.digilocker.gov.in/activecbse या वेबसाईटवर जा.
2. नवीन पेजवरसूचना वाचा
3. 'खाते पडताळणीसह प्रारंभ करा' वर क्लिक करा.
4. तुमचा शाळेचा कोड, रोल नंबर, वर्ग आणि सुरक्षा पिन टाका. 'पुढील' वर क्लिक करा.
5. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदर्शित दिसतील.
6. तुमचा मोबाईल क्रमांक टाका.
7. सबमिट वर क्लिक करा.
8. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
9. तुमचे खाते सक्रिय करण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करा.
9. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्ही 'जारी दस्तऐवज विभाग' अंतर्गत तुमचे डिजिटल मार्कशीटसह प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्र पत्र पाहण्यास सक्षम असणार आहे.
हेही वाचा-
Adani Hindenburg Dispute : अदाणी हिंडेबर्ग वाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार फैसला ?