ETV Bharat / bharat

CBSE Admit Card Out : सीबीएसई 10 -12 वीचे ऍडमिट कार्ड असे  डाउनलोड  करा - सीबीएसई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आगामी 10वी आणि 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहे. तुम्ही आता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट अर्थात cbse.gov.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. सीबीएसईने खाजगी उमेदवारांसाठी प्रवेशपत्र देखील जारी केले आहे आणि बोर्डाकडून ते डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आहे.

CBSE Admit Card Out
सीबीएसई इयत्ता 10-12वीचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रकिया
author img

By

Published : Feb 8, 2023, 1:07 PM IST

हैदराबाद : 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. 10वीची परीक्षा 21 मार्चला आणि 12वीची परीक्षा 5 एप्रिलला संपणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1.30 वाजता संपेल. यंदा परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. याआधी कोरोना महामारीमुळे परीक्षा ॲानलाइन मोडमध्ये घेण्यात आली होती. पण आता सर्व परीक्षा ॲाफलाइन मोडमध्ये घेण्यात य़ेणार आहे.

सीबीएसई प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रकिया जाणून घ्या : सर्वप्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जा.

  1. शाळेच्या लॉगिन पृष्ठावर लॉग इन करा. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे.
  2. वापरकर्ता आयडी, सुरक्षा पिन आणि इतर आवश्यक तपशील टाकावे आणि सबमिट वर क्लिक करा.
  3. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार प्रवेशपत्र डाउनलोड करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
  5. आता शाळेच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि साक्षांकन घेतल्यानंतर हे विद्यार्थ्यांना वितरित करावे लागणार आहेत.

सीबीएसई परीक्षा प्रवेशपत्र माहिती सत्यापित करण्यासाठी सूचना : बोर्डाने काटेकोरपणे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही माहिती दिली आहे.

  1. बोर्डाने दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
  2. छायाचित्र आणि इतर तपशीलांची पडताळणी केल्यानंतर योग्य ठिकाणी सही करावी.
  3. बोर्डाने शाळा व्यवस्थापन, उमेदवार आणि पालक आणि पालकांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या तपशीलांची उलटतपासणी करण्यास सांगितले आहे.
  4. तपशिलांमध्ये काही त्रुटी किंवा चूक आढळल्यास, मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि शाळा व्यवस्थापनाद्वारे मदत कक्षाशी संपर्क साधा.

ॲडमिट कार्डवरील माहिती : बोर्ड प्लेस, रोल नंबर, जन्मतारीख (फक्त 10वी साठी), उमेदवाराचे नाव, परीक्षेचे नाव, आईचे नाव, वडिलांचे/पालकाचे नाव, परीक्षा केंद्राचे नाव, PWD ची श्रेणी, विषय ज्यामध्ये परीक्षेची तारीख, प्रवेशपत्रातील प्रवेशपत्र ओळखपत्र, इत्यादी.

परीक्षा केंद्रांचा आढावा : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे तिनशे पंच्याहत्तरपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात आले आहे. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. आठ डिसेंबरपासून जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. विभागात दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.

हेही वाचा : Moderate Physical Activity : अमेरिकन झोपेच्या विकाराने ग्रस्त, शारीरिकसह मानसिक आरोग्य राखण्यासाठी उच्च-गुणवत्तेची झोप आवश्यक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.