रांची- लालू प्रसाद यादव यांचा समावेश असलेल्या चारा घोटाळ्यातील ( Lalu Prasad Yadav Fodder scam Hearing ) विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता न्यायालय 15 फेब्रुवारीला या प्रकरणी ( Lalu Prasad Yadav Fodder Scam Result ) निकाल येणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात अखेरचे आरोपी डॉ. शैलेश कुमार यांचा आज अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला.
विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 15 फेब्रुवारीला निकाल सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यासह 110 आरोपींच्या अडचणी वाढू शकतात. चारा घोटाळ्याचे सर्वात मोठे प्रकरण असलेल्या दोरांडा तिजोरीतून 139 कोटींची बेकायदा रक्कम काढण्यात आली.
हेही वाचा - Weather In India : देशभरात आताच थांबणार नाही थंडीचा कहर, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी होईल बर्फवृष्टी