ETV Bharat / bharat

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा, सिसोदिया म्हणाले, 'स्वागत आहे..'

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर छापा टाकला. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

Manish Sisodia
मनीष सिसोदिया
author img

By

Published : Jan 14, 2023, 6:05 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआय कोणत्या प्रकरणात छापा टाकण्यासाठी पोहोचली आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या आधी ऑगस्ट महिन्यातही दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणातील घोटाळ्याच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीबीआयने उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते.

मनीष सिसोदिया यांचे ट्विट : मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापे टाकले, माझ्या कार्यालयावर छापे टाकले, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही झडती घेतली. माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही आणि सापडणार नाही. कारण मी मी काहीही चुकीचे केले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम केले आहे'.

  • आज फिर CBI मेरे दफ़्तर पहुँची है. उनका स्वागत है.
    इन्होंने मेरे घर पर रेड कराई, दफ़्तर में छापा मारा, लॉकर तलशे, मेरे गाँव तक में छानबीन करा ली.मेरे ख़िलाफ़ न कुछ मिला हैं न मिलेगा क्योंकि मैंने कुछ ग़लत किया ही नहीं है. ईमानदारी से दिल्ली के बच्चों की शिक्षा के लिए काम किया है.

    — Manish Sisodia (@msisodia) January 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

19 ऑगस्ट रोजी देखील निवासस्थानावर छापा टाकला होता : सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्यासह 15 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, उत्पादन शुल्क आयुक्त आरव गोपी कृष्णा, उत्पादन शुल्क उपायुक्त आनंद तिवारी आदींची नावे होती. बरोबर दोन दिवसांनी म्हणजे 19 ऑगस्टला सीबीआय छापा टाकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर 17 ऑक्टोबर रोजी त्यांना सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्या गाझियाबाद येथील बँक खात्याचीही झडती घेण्यात आली.

मनीष सिसोदिया यांच्यावरील आरोप : मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप आहे की, उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या दुकानांना परवाने दिले तेव्हा याच काळात मनीष सिसोदिया यांनी खासगी विक्रेत्यांना 144 कोटी 36 लाख रुपयांचा फायदा मिळवून दिला. परवाना शुल्क माफ करून त्यांना फायदा झाल्याचा आरोप आहे.

आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नाही : सीबीआयने दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात 10,000 पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले आहे मात्र त्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे नाव नाही. यामध्ये सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात दाखल केले आहे. त्याचबरोबर ईडीने या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत. मात्र यामध्येही सिसोदिया यांचे नाव नाही. ईडीच्या आरोपपत्रात 12 जणांच्या नावांचा समावेश आहे.

आप आमदारांची प्रतिक्रिया : आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा म्हणाले की, 'भाजपकडे फक्त आम आदमी पक्षाच्या नेत्यांना त्रास देणे हेच काम उरले आहे. मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने 14 तास छापे टाकले. यानंतरही बेनामी संपत्ती, एक रुपयाची वसुली किंवा भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा सापडला नाही'.

हेही वाचा : AAP Political Advertisements: केजरीवालांना जोरदार झटका, सरकारी तिजोरीतून १६३ कोटी रुपयांच्या जाहिराती, पैसे भरण्याची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.