लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा सीबीआय तपास करणार आहे. या प्रकरणात सीबीआयच्या पाच सदस्यीय पथकाने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे पथक महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावर विविध 12 मुद्द्यांवर तपास करणार आहे.
योगी सरकारच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशचे गृह विभागाने महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचा सीबआयने तपास करावा, अशी शिफारिश केली होती. सुत्राच्या माहितीनुसार, गुरुवारी सीबीआयचे पथक प्रयागराजला पोहोचले होते. तपासाची जबाबदारी घेण्यापूर्वी सीबीआयच्या एका पथकाने प्रकरणाची माहिती घेतली होती. सीबीआयसोबत एसआयटी पथक आणि प्रयागराज पोलिसामधील अधिकारीही उपस्थित होते. सीबीआयने एफआयआरची प्रत घेऊन तपास प्रक्रिया सुरू केली होती.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरीला हरिद्वारमधून अटक
आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा 20 सप्टेंबरला संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलिलेल्या चिठ्ठीमध्ये आनंद गिरी, हनुमान मंदिराचे माजी पुजारी आद्या तिवारी आणि त्याचा मुलगा संदीप तिवारी यांचा समावेश आहे. पोलिसांनी आद्या तिवारी यांच्यासहित आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेतले आहे. तेव्हापासून पोलीस हे आद्या तिवारीचा मुलगा संदीप तिवारी यांचा शोध घेत होते. त्याला डीआयजीने नेमलेल्या एसआयटी पथगकाने बुधवारी अटक केली आहे. न्यायालयाने आद्या तिवारी आणि आनंद गिरी या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी संदीप तिवारीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला नैनी केंद्रीय तुरुंगात पाठविण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
हेही वाचा-महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ
यांनी केली होती सीबीआय चौकशीची मागणी
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांच्य मृत्यू प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील सुनील चौधरी यांनी दाखल केली आहे. नरेंद्र गिरी कधीही आत्महत्या करणार नाहीत, असे विविध संतांचे म्हणणे आहे. महंत यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही जणांचा वारस म्हणून उल्लेख केला आहे. भाजपचे माजी खासदार विनय कटियार यांनी महंत नरेंद्र यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष चौकशी करणे हा एकमेव मार्ग असल्याचे माजी खासदार कटियार यांनी म्हटले होते.