नवी दिल्ली सीबीआयने रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया Deputy Chief Minister Manish Sisodia आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात नाव असलेल्या १२ जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले CBI Bars Manish Sisodia अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली सरकारने तयार केलेल्या नवीन दारू धोरणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शुक्रवारी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, लुक आऊट नोटीस पाठविल्याची वार्ता वाऱ्याचे वेगाने देशभर पसरली आणि त्याचे पडसादही राजकीय क्षितीजावर उमटू लागले. त्यानंतर सीबीआयने लुक आऊट नोटीस जारी केली नसल्याचे सांगितले.
लुक आऊट नोटीसचा ड्रामा सकाळी लुक आऊट नोटीस जारी करण्याचे वृत्त येऊन धडकले. सिसोदिया यांच्यासह 15 जणांना देश सोडता येणार नसल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने देशभरात पसरली. राजकीय वातावरण तापू लागले. त्यानंतर सीबीआयने अद्याप नोटीस जारी केली नसल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय एकतर सिसोदियांना लुक आऊट नोटीस जारी करेल किंवा हे प्रकरण ईडीकडे सुपूर्द करू शकते. ईडीकडे प्रकरण दिल्यास सिसोदियांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.
लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तुमचे सर्व छापे अयशस्वी झाले, काही सापडले नाही, एका पैशाची हेराफेरी सापडली नाही. आता तुम्ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. तुम्ही म्हणत आहात की, मनीष सिसोदिया सापडले नाहीत. ही काय नौटंकी आहे मोदीजी. मी दिल्लीत सर्वांसमोर आहे. मी मुक्तपणे फिरत आहे, मला सांग कुठे येऊ. दरम्यान, शनिवारी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या पाच आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शुक्रवारी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अधिकृत निवासस्थानावर छापा टाकला. याशिवाय दक्षिण दिल्लीतील दारू कंपन्यांच्या कार्यालयांवर आणि गोदामांवरही छापे टाकण्यात आले. तर आपचे राज्यसभा खासदार यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
दिल्लीतील शालेय शिक्षणातील सुधारणांबद्दल नुकतेच सर्वत्र कौतुक झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क विभागही सांभाळतात. या घडामोडीनंतर लगेचच सिसोदिया यांनी ट्विटरवर मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली होती. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, निरपराध लोकांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. व्हिडिओसोबत दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी हिंदीमध्ये एक कॅप्शन देखील लिहिले आहे ज्याचा अनुवाद असा आहे, ऋतू हळूहळू बदलत राहतात. तथापि, तुमच्या वेगाने वाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने शनिवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतरांना चौकशीसाठी समन्स बजावले. दरम्यान, त्याआधी शुक्रवारी पहाटेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा मारून तपासणी केली होती. जवळपास 12 तास सीबीआयचे पथक मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी तळ ठोकून होते.
स्वतःच दिली माहिती मनीष सिसोदिया यांनीच ट्विट करून सीबीआयने आपल्या घरी छापा मारल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणेकरून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही. ते म्हणाले दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर आपचे खासदार संजय सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की मोदीजी नाटक का करताय. सीबीआय दहशतवाद्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करत नाही, लाखो-करोडो रुपये लुटणाऱ्यांविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावत नाही, तर शिक्षण व्यवस्था दुरुस्त करणाऱ्यांविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली जात आहे. संपूर्ण देश हे पाहत आहे.