ETV Bharat / bharat

Delhi Liquor scam case : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी के कविता यांच्या माजी ऑडिटरला अटक - के कविता यांची चौकशी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांच्या माजी ऑडिटरला मंगळवारी अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बूचीबाबू गोरंटला याला अटक केली आहे. २०२२ मध्ये देखील बूचीबाबू गोरंटला याच्या अरविंद नगर, डोमलगुडा येथील त्यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) छापा टाकला होता.

Delhi Liquor scam case
के कविता यांच्या एक्स ऑडिटरला अटक
author img

By

Published : Feb 8, 2023, 10:34 AM IST

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आणखी एकाला अटक केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात चालू असलेल्या तपासात, सीबीआयने हैदराबादस्थित चार्टर्ड अकाउंटंट बूचीबाबू गोरंटला यांना अटक केली आहे. घाऊक आणि किरकोळ परवानाधारकांना चुकीचा फायदा मिळवून दिल्याबद्दल त्याला अटक केली आहे. विषेश म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मुलीचा तो एक्स ऑडिटर होता. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मंगळवारी उशिरा अटक : मंगळवारी उशिरा अटक करण्यात आली. पोलिसांना तपासात त्याच्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने चौकशी दरम्यान टाळाटाळाकरत असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे मुख्यमंत्री यांचे नाव देखील या प्रकरणामुळे अधीक चर्चेत आले आहे. २०२२ मध्ये बूचीबाबू गोरंटला याच्या अरविंद नगर, डोमलगुडा येथील त्यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) छापा टाकला होता. कारण कवितासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे त्यांने पर्सनल ऑडिटर म्हणून काम केले होते. याआधी सीबीआयने कविता यांची चौकशी केली होती. बूचीबाबू गोरंटला यांच्याकडून कविता यांनी काही आर्थिक गैरव्यवहार केले का याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते.

के कविता यांची चौकशी : दिल्ली दारू घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने कविता यांची त्यांच्या बंजारा हिल्स निवासस्थानी चौकशी केली होती. त्यावेळी के कविता यांच्या समर्थनार्थ परिसरात पोस्टरबाजी पहायला मिळाली होती. चौकशीच्या एक दिवस आधी, त्यांच्या घराजवळ, त्यांच्या समर्थकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले होते. योद्ध्याची मुलगी घाबरणार नाही, आम्ही कविता अक्का सोबत आहोत अशा आशयाचे पोस्टर परिसरात पहायला मिळाले होते. या घोटाळ्यातील कथित लाचखोरीबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात कविता यांचे नाव समोर आल्यानंतर, त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले होते. १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

केसीआर यांची नांदेडमध्ये सभा : बीआरएस प्रमुख व तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर हे रविवारी 5 तारखेला नांदेडमध्ये आले होते. पक्षाचे नाव बदलल्यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिली जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर केसीआर यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली.

हेही वाचा : Shivaji Maharaj Statue Stolen : अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.