नवी दिल्ली : रेल्वे रुळावर होणारे जनावरांचे अपघात ( Railway Accidents ) रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnav ) म्हणाले की, अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी विशेष प्रकारच्या संरक्षक भिंतीच्या नवीन डिझाइनला परवानगी देण्यात आली आहे. ५ ते ६ महिन्यांत रुळाला लागून नवीन भिंत बसवण्यात येणार आहे. सहा महिन्यांत 1हजार किमीची भिंती बांधण्यात येणार आहे. ( Railways To Build 1000 Km Of Boundary Walls ) वंदे भारत रेल्वे सोबत ( Vande Bharat Express ) अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेनची अनेकवेळा गुरांना धडक दिली : उल्लेखनीय म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यात वंदे भारत ट्रेनने अनेकवेळा गुरांना धडक दिली. सलग दोन दिवसांत अशा दोन घटना घडल्या. अशाच एका घटनेत गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने ( Vande Bharat Express ) एका गायीला धडक दिली. अपघातामुळे ट्रेनच्या पुढील भागाचेही किंचित नुकसान झाले आहे. गुजरातमधील आनंद स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाची जीवित हानी झाली नसली तरी या अपघाताच्या एक दिवस आधी सेमी हायस्पीड ट्रेनने चार म्हशींना धडक दिली होती.
गुरांसोबत होणारे अपघात रोखण्यासाठी निर्णय : या घटनेवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रतिक्रिया दिली होती. रुळांवर गुरांची धडक होणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेनची रचना करताना हे लक्षात ठेवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी गुरांसोबत होणारे अपघात रोखण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही सांगितले होते. तर ऑक्टोबरच्या पहिल्या नऊ दिवसांत रुळांवर गुरे आल्याने जवळपास 200 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यावर्षी आतापर्यंत सुमारे 4,000 गाड्या अशा प्रकारे प्रभावित झाल्या आहेत.