ETV Bharat / bharat

Case Registered Against Ramesh Thete : निवृत्त आयएएस अधिकारी रमेश थेटेसह त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल - retired IAS officer Ramesh Thete

लोकायुक्तांनी निवृत्त आयएएस अधिकारी रमेश थेटेसह त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोकायुक्तांनी 20 वर्षांनंतर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रमेश थेटे यांच्यावर आत्तापर्यंत 25 खटले दाखल करण्यात आले आहे.

Case Registered Against Ramesh Thete
Case Registered Against Ramesh Thete
author img

By

Published : Feb 8, 2023, 11:09 PM IST

भोपाळ : निवृत्त आयएएस रमेश थेटे आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लोकायुक्तांनी 20 वर्षांनंतर एफआयआर नोंदवला आहे. रमेश थेटे यांनी त्यांच्या पत्नी मंदा थेटे यांच्या नावाने विविध 68 बँकांकडून कर्ज घेतले होते. 2012-13 मध्ये अल्पावधीतच त्यांनी हे कर्ज परत जमा केले होते. तपासात उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले असून त्याआधारे रमेश थेटे व त्यांची पत्नी मंदा थेटे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर लोकायुक्त प्रकरणात अडकलेले रमेश थेटे आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध पुन्हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Case Registered Against Ramesh Thete
निवृत्त आयएएस अधिकारी रमेश थेटेसह त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल

कोण आहेत रमेश थेटे : मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावर दलितविरोधी असल्याचा आरोप करणारे रमेश थेटे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. निवृत्त होण्यापूर्वी आयएएस रमेश थेटे यांनी सीएम शिवराज सिंह यांना पदोन्नतीबाबत पत्र लिहिले होते. मात्र, तरीही त्यांना बढती देण्यात आली नाव्हती. त्यावरुन दलित असल्याने माला जिल्हाधिकारी बनवण्यात आले नाही, असा आरोप थेटे यांनी केला होता.

थेटे यांचे वादग्रस्त प्रकरणे : रमेश थेटे यांनी आयएएस राधेश्याम जुलानियावर जातीवादी असल्याचा आरोप केला होता. तर आयएएस जेएन कॉन्सोटिया यांनी राखीव प्रवर्ग असतानाही आरक्षण आंदोलनाला विरोध केला असे त्यांचे म्हणणे होते. 2016 मध्ये त्यांना आयएएस अधिकारी राधेश्याम जुलानिया यांच्या नेतृत्वाखाली पंचायत, ग्रामविकास विभागात सचिव करण्यात आले होते. मात्र, त्यांना इच्छेप्रमाणे पद न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यात जुलानिया यांच्यावर जातीयवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला होता. त्याचवेळी आयएएस अधिकारी जेएन कॉन्सोटिया यांच्या संघटनेने आरक्षण वाचवा आंदोलन चालवले होते. मात्र, राखीव प्रवर्ग असतानाही थेटे यांनी त्यांना विरोध केला होता. निवृत्तीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पत्र लिहून सरकारवर पक्षपाताचा आरोपही केला होता.

लोकायुक्तांनी नोंदवला गुन्हा : आयएएस अधिकारी रमेश थेटे 2001-02 मध्ये जबलपूर महानगरपालिकेत आयुक्त होते. त्यानंतर त्यांची रोजगार संचालक आणि प्रशिक्षण पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी त्याच्या पत्नी मंदा थेटे यांच्या नावावर जबलपूरच्या अनेक बँकांमध्ये ६८ लाख रुपयांचे कर्ज होते. मात्र, त्यांनी कर्जाची रक्कम काही दिवसातच वापस केली होती. ज्यात 2013 मध्ये लोकायुक्त संघटनेने त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरच्या तपासानंतर जबलपूर युनिटने लोकायुक्तांच्या विशेष पोलिस युनिटची स्थापना केली होती. थेटे यांच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध पीसी ऍक्ट तसेच भादंवि अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अनेक गुन्हे दाखल : रमेश थेटे यांच्यावर लोकायुक्तात अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर सरकारने त्यांना पोस्टिंग दिली होती. स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेत थेटे यांना कलेक्टरची जबाबदारी दिली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत 25 खटले दाखल करण्यात आले आहे. कोर्टातून त्याला दिलासा मिळाल्यावर त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करून तिला सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या थेट नागपुरात राहत असुन त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. दलितांवर आधारित कंपनी स्थापन करून चित्रपटाची निर्मितीही थेटे यांनी केली आहे.

हेही वाचा - Asaduddin Owaisi On Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असदुद्दीन ओवेसींचा प्रहार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.