बक्सर (बिहार) : बिहारच्या बक्सरमध्ये एका कार चालकाने विजेच्या खांबाला एवढ्या जोरात धडक दिली की विजेचा खांब जमिनीवरून उखडला आणि हवेत उडाला. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, खांबातून विजेच्या ठिणग्या बाहेर पडल्या. या धडकेत कारची पुढची बाजूही कामातून गेली. मात्र आश्चर्य म्हणजे हेडलाईट तुटले नाहीत.
धडकल्यानंतर कारचे किरकोळ नुकसान : या घटनेचा व्हिडिओ शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. कोणी 'ड्रिंक ड्राईव्ह' म्हणत आहेत, कोणी 'स्टंट बाज', तर कोणी 'जबरदस्त' लिहून कमेंट करत आहेत. जो कोणी हा व्हिडीओ पाहतो आहे त्याला एकच प्रश्न पडतो आहे की, एवढी जोरदार धडक होऊनही कारला मोठे काहीच कसे झाले नाही. तसेच ही कार कोणत्या कंपनीची आहे?, असा प्रश्नही लोक विचारत आहेत.
कार चालक आरामात निघून गेला : हा व्हिडिओ बक्सरच्या नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आमला टोला येथील आहे. येथे एक कार चालक भरधाव वेगाने येतो, आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकतो. धडकेनंतर खांब चेंडूसारखा उसळतो. त्यानंतर कार चालक त्याच वेगाने कार घेऊन निघून जातो. घटनेनंतर तेथे आधीच उभे असलेले लोक घाबरून घरात घुसतात आणि विजेच्या खांबातून बाहेर पडलेल्या ठिणग्या रस्त्यावर पसरतात.
व्हायरल व्हिडीओबाबत पोलिसांना माहिती नाही : हा व्हायरल व्हिडीओ पाहून आधी लोकांना वाटले की हा एखाद्या चित्रपटाचा सीन आहे. पण जेव्हा सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला गेला तेव्हा प्रकरण अमला टोलाचे असल्याचे निष्पन्न झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजबाबत शहर स्टेशन प्रभारी दिनेश मालाकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही आणि सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिलेले नाही.
या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांकडूनच मिळत आहे. तो व्हिडिओ पोलिसांना प्राप्त होताच, घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून कार चालकाची माहिती घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. - दिनेश मालाकर, प्रभारी, शहर पोलिस ठाणे
हेही वाचा :