चेन्नई Car Driver Received 9K Crore : भाड्यानं कार चालवणाऱ्या चालकाच्या खात्यात बँकेतून तब्बल 9 हजार कोटी रुपये जमा झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना तामिळनाडूमधील पलानी नेयकरपट्टी इथं उघडकीस आली. राजकुमार असं या कार चालकाचं नाव आहे. तो कोडंबक्कममध्ये मित्राच्या खोलीवर भाड्यानं राहतो. बँक खात्यात 9 हजार कोटी जमा झाल्यानं या कारचालकाला मोठा सुखद धक्का बसला होता, मात्र अर्धा तासच त्याला हे सुख उपभोगता आलं.
मर्कंटाईल बँकेतून झाले 9 हजार कोटी रुपये जमा : पलानी इथला राजकुमार हा 9 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजता कारमध्ये झोपला होता. यावेळी त्याला मर्कंटाईल बँकेतून एक मेसेज आला. राजकुमारच्या खात्यात तब्बल 9 हजार कोटी रुपये जमा झाल्याचं मेसेज सांगत होता.
किती पैसे जमा झाले मोजता आले नाहीत : राजकुमारच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं त्याला आपल्या खात्यात किती पैसे जमा झाले, याचं मोजमाप करता आलं नाही. त्यामुळे तो गोंधळून गेला. राजकुमारला शून्याची मोजमापंच करता आली नाही. त्यानंतर त्याला आपल्या खात्यात 9 हजार कोटी जमा झाल्याचं पाहून मोठा आनंद झाला.
कुणीतरी फसवणूक करत असल्याचं वाटलं : आपल्या बँकेत एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचं पाहून राजकुमार प्रचंड गोंधळून गेला. आपली कोणीतरी टिंगल करत असल्याचं त्याला वाटलं. त्यानंतर त्याला थुथुकुडी येथील मर्कंटाईल बँकेतून कॉल आला. यावेळी बँकेनं त्याला त्याच्या खात्यात चुकून 9 हजार कोटी जमा झाल्याचं सांगितलं. जमा झालेले पैसे खर्च करु नका, असंही त्याला यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बजावलं. मात्र राजकुमारनं 21 हजार रुपये एका मित्राला दिल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची भेट करून पैसे काढून घेतले. यावेळी त्याला धमक्याही देण्यात आल्या असा त्याचा दावा आहे.
हेही वाचा :
Rs 500 Note : पाचशेच्या 1761 दशलक्ष नोटा छापखान्यातून गायब? अजित पवार यांनी केली चौकशीची मागणी