नवी दिल्ली : कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवला. या घटनेवरुन भारतातून संताप व्यक्त केला जात आहे. भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅकाय यांनी या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा कॅनेडियन सरकारसमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही निषेध नोंदवला आहे.
ट्विटवरुन केला निषेध : भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅकाय यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. मॅके म्हणाले की, कॅनडातील एका कार्यक्रमाच्या वृत्तामुळे दु: खी आहे आणि त्या घटनेचा निषेध करतो. मॅकाय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करत म्हटले की, भारताताच्या दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा केला गेला, एका कार्यक्रमाच्या वृत्ताने मी हैराण झालो आहे. कॅनडात द्वेष किंवा हिंसाचाराचे उदात्तीकरणाला स्थान नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी 5 किलोमीटरपर्यंत मिरवणूक काढली होती. त्यात दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवण्यात आला. व्हिडिओमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा रक्ताने माखलेला दिसत आहे. सोशल मीडियावर या मिरवणुकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर कॅनडाचे राजदूतांनी निषेध व्यक्त केला आहे. इंदिरा गांधी जानेवारी 1966 ते 1977 पर्यंत त्यानंतर 1980 ते 1984 पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी होत्या. भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. दरम्यान 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या दोन अंगरक्षकांनी त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
भारत सरकारने स्पष्टीकरण मागितले : दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा भंगानंतर झाल्यानंतर ओटावा येथील भारतीय दूतावासात परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावले होते. यावेळी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. भारताच्या राजनैतिक मिशन आणि वाणिज्य दूतावासांच्या सुरक्षेचा भंग करण्यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत अशा घटकांना परवानगी कशी दिली गेली. याचे स्पष्टीकरण भारत सरकारने कॅनडाच्या उच्चायुक्तांतडे मागितले आहे. फुटीरतावादी आणि अतिरेकी घटकांच्या कृतींबद्दल आम्ही खूप चिंता व्यक्त करतो. याची कल्पना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांना दिली आहे.
परराष्ट्रीय मंत्र्यांनी केली कानउघडणी : परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना हा मुद्दा कॅनेडियन सरकारसमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे. कॅनडाने आपल्या भूमीवरून भारतविरोधी घटकांना कारवाया करण्याची मुभा देणे हे द्विपक्षीय संबंधांसाठी आणि त्याच्या स्वत:साठीही चांगले नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. हे केवळ मतपेटीचे राजकारण असू शकते, अशी टीकाही जयशंकर यांनी केली.
कारवाई करावी -मीनाकाशी लेखी : इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवण्यात आले यावरुन राज्यमंत्री एमईए मीनाकाशी लेखी यांनी कॅनडा सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, कोणत्याही लोकशाही शासनात कोणतीही हत्या किंवा हत्या हा गुन्हा आहे. त्या पुढे म्हणाल्या की कॅनडामध्ये जे काही घडत आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या कक्षेत येते आणि सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे. मीनाकाशी लेखी म्हणाल्या, “कोणत्याही लोकशाही शासनात कोणतीही हत्या किंवा हत्या हा गुन्हा आहे. त्यामुळे जे काही गुन्हा आहे ते साजरे केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे कॅनडामध्ये जे काही घडत आहे. ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या कक्षेत येते आणि सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे. खलिस्तानी समर्थकांच्या या मिरवणुकीचा व्हिडीओ काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शेअर केला आहे. यात व्हिडिओमध्ये इंदिरा गांधी यांना त्याचे अंगरक्षक गोळ्या मारताना दिसत आहेत.