ETV Bharat / bharat

Canada Demanded Security For Diplomats : व्यावसायिक दूतावासांना सुरक्षा देण्याची कॅनडाची भारताकडे मागणी - कॅनडाचे भारतावर गंभीर आरोप

Canada Demanded Security For Diplomats : कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमच्या राजदुताना धमक्या आल्या आहेत. त्यामुळं, सावधगिरी बाळगून आम्ही भारतातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Canada Demanded Security For Diplomats
Canada Demanded Security For Diplomats
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 7:13 PM IST

नवी दिल्ली Canada Demanded Security For Diplomats : कॅनडानं नवी दिल्लीतील उच्चायुक्तालय, मुंबई, चंदिगड, बेंगळुरू येथील व्यावसायिक दूतावासाला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या धमक्यांच्यानंतर कॅनडाच्या उच्चायुक्तांनी भारत सरकारला अवाहन केलंय. देशात राहणाऱ्या राजदूतांना, कॅनडाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडं केलीय. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळं राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत.

कॅनेडियन कर्मचाऱ्यासांठी कडक सुरक्षा : कॅनेडियन उच्चायुक्तालयानं भारतात कॅनेडियन नागरिकांसाठी आपली सेवा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. "आमचं उच्चायुक्तालय भारतातील सर्व वाणिज्य दूतावास कार्यान्वित आहेत. आम्ही देशात नागरिकांना सेवा देत आहोत. ग्लोबल अफेअर्स कॅनडा आमच्या मिशन, कर्मचार्‍यांच्या सुरक्षेवर सतत लक्ष आहे. तसंच राजदूत, कर्मचाऱ्यासांठी कडक सुरक्षा व्यावस्था करण्यात आली आहे," असं एका अधिकाऱ्यांन सांगितलंय.

कॅनडाच्या वाणिज्य दूतांना सुरक्षा द्या : दोन्ही देशातील वाढत्या तणावपूर्ण वातावरणात, कॅनडाचे अधिकारी भारतातील त्यांच्या राजदूत तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहेत. भारतातील काही राजदूतांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या आल्या आहेत. त्यामुळं कॅनडानं सावधगिरीचं पाऊल म्हणून, भारतातील कर्मचारी उपस्थिती तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ग्लोबल अफेयर्स कॅनडानं स्पष्ट केलंय की, भारतानं कॅनडाच्या वाणिज्य दूतांना सुरक्षा प्रदान करून आपली जबाबदारी पाळावी.

कॅनडाचे भारतावर गंभीर आरोप : खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीयांचा सहभाग असल्याच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपांमुळे तणाव वाढलाय. त्यामुळं कॅनडाच्या राजदूतांना भारतानं देश सोडण्याचे आदेश दिले होते. गेल्या तीन दिवसांत कॅनडाविरुद्ध भारताचं हे तिसरं कठोर पाऊल उचललं आहे. यापूर्वी भारतानं कॅनडाला जाणाऱ्या लोकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली होती. विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, कॅनडानं भारताचे आरोप फेटाळून लावत कॅनडा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.

भारताची कॅनडाविरोधात कडक भूमिका : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केल्यावर भारतानं त्याविरोधा कडक भूमिका घेतलीय. निज्जरच्या हत्येत भारतीय राजदूताचा तसंच तपास यंत्रणांचा हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारतानं त्यांचे आरोप फेटाळून लावत, कॅनडात राहणाऱ्या विद्यार्थी तसंच नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली होती.

हेही वाचा -

  1. Canada Visa Service Suspend : भारत सरकारचा कॅनडाला झटका; कॅनडाची व्हिसा सेवा स्थगित
  2. Indian Government Advisory On Canada : कॅनडामधील भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांना सरकारची ॲडव्हायजरी जारी
  3. Canada Travel Advisory : 'जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळा', कॅनडानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.