जम्मू : कटराला जाणारी भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटलीजवळ आज सकाळी घडली. या अपघातात 10 ते 12 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुरक्षा दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
-
#WATCH | "All the injured are being medically treated, they are being extended all help," says J&K Chief Secretary Arun Kumar Mehta after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/8FDKc6p5W1
— ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "All the injured are being medically treated, they are being extended all help," says J&K Chief Secretary Arun Kumar Mehta after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/8FDKc6p5W1
— ANI (@ANI) May 30, 2023#WATCH | "All the injured are being medically treated, they are being extended all help," says J&K Chief Secretary Arun Kumar Mehta after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/8FDKc6p5W1
— ANI (@ANI) May 30, 2023
अमृतसरहून कटराला जात होती : आज सकाळी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटलीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाल्याची माहिती जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. बसचे नियंत्रण सुटून ती खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बस अमृतसरहून कटराला जात होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच कल्लोळ झाला. अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
-
J-K: Death toll in Jammu bus accident mounts to 10
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/QdweWEvvIK#JammuAndKashmir #accident pic.twitter.com/Lt0efE25gp
">J-K: Death toll in Jammu bus accident mounts to 10
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023
Read @ANI Story | https://t.co/QdweWEvvIK#JammuAndKashmir #accident pic.twitter.com/Lt0efE25gpJ-K: Death toll in Jammu bus accident mounts to 10
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023
Read @ANI Story | https://t.co/QdweWEvvIK#JammuAndKashmir #accident pic.twitter.com/Lt0efE25gp
अनेक नागरिकांचा घटनास्थळीच झाला मृत्यू : बस दरीत कोसळ्याची माहिती मिळताच सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलही घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळावरुन मृतदेहही रुग्णालयात नेण्यात आले आहेत. क्रेनच्या सहाय्याने बस खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बसखाली कोणीही अडकणार नाही याचीही काळजी घेण्यात आली.
-
#WATCH | We are trying to provide the best possible care to the injured. 10 people have died and 2-3 are critically injured, says J&K DGP Dilbagh Singh after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/gcxFYHmNoM
— ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | We are trying to provide the best possible care to the injured. 10 people have died and 2-3 are critically injured, says J&K DGP Dilbagh Singh after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/gcxFYHmNoM
— ANI (@ANI) May 30, 2023#WATCH | We are trying to provide the best possible care to the injured. 10 people have died and 2-3 are critically injured, says J&K DGP Dilbagh Singh after meeting the people injured in the bus accident in Jammu pic.twitter.com/gcxFYHmNoM
— ANI (@ANI) May 30, 2023
अपघातग्रस्तांमध्ये बिहारच्या नागरिकांचा समावेश : या घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीआरपीएफचे सहायक कमांडंट अशोक चौधरी यांनी ही बस अमृतसरहून येत होती आणि त्यात बिहारचे नागरिक असल्याची माहिती दिली. हे नागरिक बहुधा कटरा जाण्याचा रस्ता विसरून येथे पोहोचले असावेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नायब राज्यपालांनी केला शोक व्यक्त : जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'जम्मूच्या झज्जर कोटली येथे झालेल्या वेदनादायक बस अपघातातील लोकांच्या मृत्यूने मला खूप दुख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. जखमींना सर्वतोपरी मदत व उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
हेही वाचा -
Tractor Trolley Accident : भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली; 9 जणांचा जागीच मृत्यू