ETV Bharat / bharat

'Bulli Bai' app case : बुली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; दिल्ली पोलिसांची कारवाई - बुली बाई प्रकरण लेटेस्ट न्यूज

'Bulli Bai' app case
बुली बाई प्रकरण
author img

By

Published : Jan 6, 2022, 1:10 PM IST

Updated : Jan 6, 2022, 4:49 PM IST

16:48 January 06

'Bulli Bai' app case : बुली बाई प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; दिल्ली पोलिसांची कारवाई

13:02 January 06

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं आणि वादग्रस्त बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं आसाममधून अटक ( Bulli Bai app case Main conspirator arrested ) केली आहे. आरोपीचे नाव नीरज बिष्णोई असे आहे. पोलिसांचे पथक त्याला दिल्लीत घेऊन येत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नीरजनेच गिटहबवर बुली बाई अ‍ॅप तयार केलं आणि तोच या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. या अ‍ॅपचं ट्विटर अकाउंट देखील नीरज बिष्णोईच चालवत होता, अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी दिली.

नीरज बिष्णोईने ट्विटर आणि गिटहबवर बुली बाई नावाने अकाउंट तयार करून त्यावर एका महिला पत्रकाराचे फोटो टाकले होते. याबाबत दक्षिण पूर्व जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली सायबर सेलकडून सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांना नीरज हा यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. या माहितीवरून पोलीस पथकाने त्याला आसाममधून अटक केली आहे.

बुली बाई प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. श्वेता सिंह, शुभम रावत, विशाल कुमार आणि आज अटक केलेला नीरज अशी या आरोपींची नावे आहेत. तीघांना मुंबई पोलिसांनी तर एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्यांदा विशालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर श्वेता सिंह आणि शुभम रावतला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर नीरजला अटक झाली आहे.

कोण आहे नीरज?

नीरज बिष्णोई असे या मुख्य आरोपीचे पूर्ण नाव असून तो 20 वर्षाचा आहे. आसामच्या जोरहाटमधील दिगंबर भागातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे.

कोण आहे विशाल?

मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणी बंगळुरूवरून विशाल कुमार नावाच्या आरोपीला अटक केली होती. विशाल कुमार हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. विशाल बुल्ली बाई अॅपवर महिलांचे फोटो एडीट करायचा आणि त्यानंतर ते फोटो अॅपवर अपलोड करत होता, अशी माहिती आहे. विशालनेच श्वेता सिंहच्या नावाचा खुलासा केला होता. त्यानंतर श्वेताला अटक करण्यात आली.

श्वेता सिंह आहे तरी कोण?

श्वेता सिंग ही 18 वर्षीय तरुणी उत्तराखंडची रहिवासी असून 12 वी पास आहे. सोशल मीडियावर मुस्लीम महिलांना बदनाम करण्याचे काम केल्याने मुंबई पोलिसांनी श्वेता सिंहला उधमसिंह नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे. श्वेताच्या आई आणि वडिल दोघांचे निधन झाले आहे. तीन बहिणी आणि एक भाऊ, असे तीचे कुटुंब असून ते आर्थिक संकटात सापडलेले आहे. तिच्या मनात मुस्लिमांबद्दल इतका द्वेष का निर्माण झाला, की तिने पैशांसाठी हे काम केले, याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेताला मुंबईत आणलं जाणार आहे.

कोण आहे शुभम रावत?

श्वेता सिंहकडून शुभम रावत बद्दल माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुभमला उत्तराखंडमधून अटक केली आहे. शुभम रावत हा दिल्लीतील एका महाविद्यालयात शिकत होता. त्याला कोटद्वारच्या निमुचौड परिसरातून अटक करण्यात आली आहे.

काय आहे बुली बाई अॅप?

बुली बाई ( Bulli Bai App ) या अ‍ॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अ‍ॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अ‍ॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

हेही वाचा - Bulli Bai App Case : बुली बाई अ‍ॅप प्रकरणात मोठा खुलासा; 'जाट खालसा 7' टि्वटर अकांऊटचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास

Last Updated : Jan 6, 2022, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.