लखनौ (यूपी): ही इमारत जुनी होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे ती कोसळल्याने अनेक लोक इमारतीच्या मलब्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
8 जणांना बाहेर काढण्यात यश: माहितीनुसार, इमारत कोसळल्याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपार्टमेंटमध्ये अनेक कुटुंबे राहत होती. इमारतीच्या मलब्याखाली अनेक लोक गाडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अलया अपार्टमेंटमध्ये 7 कुटुंबे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. कोसळलेल्या इमारतीखाली 15 ते 20 लोक अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या 8 जणांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू : इमारत कोसळण्यामागे भूकंपाचे धक्के कारणीभूत असल्याचे यूपीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर इमारतीला तडा गेल्याची माहिती मिळाल. मात्र इमारतीत राहणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि इमारत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली. यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. इमारत कोसळल्यानंतर त्याचा मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : हजरतगंज परिसरातील वजीर हसन रोडवर हा अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन गाडल्या गेलेल्या लोकांना मलब्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
नोट : अपडेट माहिती थोड्याच वेळात...