बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला आहे. पण, येडीयुराप्पा यांनी हा दर्जा नाकारला आहे.
केवळ माजी मुख्यमंत्र्याप्रमाणे सुविधा द्याव्यात, असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई पत्र लिहिले आहे. येडीयुराप्पा यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री बोम्माई यांनी शनिवारी दिले होते. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड अॅडमिनिस्ट्रिट्वह रिफॉर्मसच्या (डीपीएआर) प्रोटोकॉल विभागानेही तशी अधिसूचना काढली होती.
हेही वाचा-आरक्षणाबाबतच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधक पाठिंबा देणार - मल्लिकार्जुन खरगे
येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारून 28 जुलैला 2 वर्षे पूर्ण होत असताना राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. बोम्माई यांनी 23 जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. येडीयुराप्पा यांच्याकडे आमदारकी वगळता कोणतेही पद नाही. सरकारी सुत्राच्या माहितीनुसार कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला काही भत्ते, कार्यालयाकरिता जागा, वाहन आणि इतर सुविधा मिळतात.
हेही वाचा-PM-Kisan Scheme: किसान सन्मान निधीच्या पुढच्या हफ्त्याचं आज लाभार्थ्यांना वाटप