ETV Bharat / bharat

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह भाजपावर नाराज? जेपी नड्डांची घेतली भेट - संजय सिंह

Brij Bhushan Sharan Singh : रविवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यानंतर ब्रिजभूषण त्यांची खासदारकी सोडू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 7:48 AM IST

Updated : Dec 25, 2023, 12:09 PM IST

लखनऊ Brij Bhushan Sharan Singh : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे केंद्र सरकारवर नाराज आहेत. त्यांचा जवळचे मित्र संजय सिंह यांच्या विजयानंतर क्रीडा मंत्रालयानं अखिल भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व निलंबित केल्यानं ते सरकारवर नाराज असल्यांची जोरदार चर्चा आहे. ब्रिजभूषण यांनी रविवारी संध्याकाळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामाही देण्याची इच्छा असल्याचं त्यांनी नड्डांना सांगितल्याचं बोललं जातंय. ब्रिजभूषण यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कैसरगंज येथील खासदार ब्रिजभूषण आपल्या क्षेत्रात अतिशय प्रभावी : ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील कैसरगंज, बहराइच आणि गोंडा भागात भाजपाचे वजनदार नेते आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते अनेक जागांवर प्रभावी ठरू शकतात, असं मानलं जातंय. अशा स्थितीत त्यांची थेट नाराजी ओढवून घेत भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं. ब्रिजभूषण यांचे खास संजय सिंह यांची अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर क्रीडा मंत्रालयानं कुस्ती महासंघाचं सदस्यत्व निलंबित केलंय.

कुस्तीपटूंनी केले अनेक आरोप : हरियाणाची कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर खेळाडुंनी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आपला पुरस्कार मागं घेण्याची घोषणा तर केलीच, पण जाहीरपणे सरकारच्या धोरणाविरोधात निषेधही नोंदवलाय. साक्षीनं तर आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. यानंतर क्रीडा मंत्रालयानं अखिल भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व निलंबित केले. तर 24 तासांत समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

भाजपा लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, या कारवाईनंतर ते नक्कीच संतापले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतलीय. ब्रिजभूषण यांनी जेपी नड्डा यांना राजीनामा देऊ केल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. आपल्या वर्चस्वाला एवढा मोठा फटका बसण्यास ते तयार नव्हते. येत्या काळात भारतीय जनता पार्टीही याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो, असंही मानलं जातंय.

हेही वाचा :

  1. माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह
  2. कुस्तीपटूंच्या विरोधानंतर क्रीडा मंत्रालयाला जाग; भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

Last Updated : Dec 25, 2023, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.