ETV Bharat / bharat

boyfriend arrested in shimla चंदीगड विद्यापीठ व्हिडिओ प्रकरण : आरोपी विद्यार्थिनीच्या प्रियकराला शिमला येथून अटक - Chandigarh University Video Case

मोहालीतील एका खासगी विद्यापीठात आंघोळ करताना विद्यार्थिनींचा व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थिनीच्या कथित प्रियकराला शिमला येथून अटक करण्यात आली ( boyfriend arrested in shimla ) आहे. पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. वाढता गोंधळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने 2 दिवस (19 आणि 20 सप्टेंबर) बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा दावा आहे की, आरोपी विद्यार्थिनीने 50-60 मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.

boyfriend arrested
boyfriend arrested
author img

By

Published : Sep 18, 2022, 8:33 PM IST

Updated : Sep 18, 2022, 11:00 PM IST

शिमला : मोहालीतील एका खासगी विद्यापीठात आंघोळ करताना विद्यार्थिनींचा व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थिनीचा प्रियकर आणि आणखी एका युवकाला शिमला येथून अटक करण्यात आली ( boyfriend arrested in shimla ) आहे. शिमला पोलिसांनी या दोघांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सध्या शिमला पोलीस या प्रकरणी कुठलेही भाष्य करताना दिसत नाहीत. आरोपी तरुण हा शिमल्यातील ढाली भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपी विद्यार्थिनीच्या प्रियकरासह आणखी एकाला शिमला येथून अटक

विद्यार्थिनींचा व्हिडिओ लिक झाल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. वाढता गोंधळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने 2 दिवस (19 आणि 20 सप्टेंबर) अभ्यास वर्ग बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा दावा आहे की, आरोपी विद्यार्थिनीने 50-60 मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.

अत्यंत दुर्दैवी घटना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पंजाब पोलिसांनी हिमाचल पोलिसांकडून सहकार्य मागितल्याचे त्यांनी सांगितले. डीजीपी संजय कुंडू यांना याबाबत मोहाली पोलिसांना सहकार्य करून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य पोलीस या संदर्भात पंजाब पोलिसांना पूर्ण सहकार्य करतील. जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पोलिसांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात मोहालीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. याबाबत कोणत्याही अफवा न पसरविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरविण्याचे मोहाली पोलिसांचे आवाहन

चंदीगड विद्यापीठानेही या संपूर्ण प्रकरणी निवेदन जारी केले आहे. इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. कोणत्याही विद्यार्थिनीचा कोणताही व्हिडिओ आक्षेपार्ह आढळला नाही. एका मुलीने शूट केलेला खाजगी व्हिडिओ वगळता जो तिच्या प्रियकरासह शेअर केला होता. त्याचवेळी 7 मुलींनी आत्महत्या केल्याची अफवा पसरली आहे, तर सत्य हे आहे की एकाही मुलीने असे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

Last Updated : Sep 18, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.