लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाकरिता तयारी करणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बदायू जिल्ह्यात घडली आहे. कार्यक्रमात भगतसिंगाची भूमिका करण्यासाठी हा मुलगा सराव करत होता. सरावादरम्यान मुलाने गळ्यात दावे अडकवून घराच्या छताला बांधले. यावेळी अचानक स्टूल निसटल्याने मुलाचा मृत्यू झाला.
बदायू जिल्ह्यातील कुवरगाव ठाण्याच्या हद्दीत बावट हे गाव आहे. गावामध्ये शिवम हा 9 वर्षाचा मुलगा मित्रांसमवेत खेळत होता. त्याचे आई-वडील हे शेतात काम करत होते. 15 ऑगस्टला एका कार्यक्रमात मुले ही भगतसिंग, राजगुरू असे विविध भूमिका करणार होते. आरती यांचा मुलगा शिवम हा भगतसिंगची भूमिका करणार होता. मुलाने दावे घेऊन गळ्यात बांधले. स्टूलच्या मदतीने ते घराच्या छताला दोरी बांधली.
शिवमच्या मृत्यूने परिसरात हळहळ
अचानक स्टूल निसटल्याने शिवम हा दोरीवर लटकू लागला. हे पाहून घाबरलेली मुले पळून गेली. काही वेळेनंतर शिवमची आई घरी आल्यानंतर त्यांना ते दृश्य पाहून धक्का बसला. त्यांनी मुलाला खाली उतरविले. परंतु, मुलाचा तोपर्यंत मृत्यू झाला. शिवमच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईकांनी मुलाचे शवविच्छेदन न करता अंतिमसंस्कार केले आहेत.
हेही वाचा-CBSE 12 वीचा लागला 99% निकाल, या वेबसाईटवर बघा तुमचा निकाल