ETV Bharat / bharat

Lingayat Politics : बॉम्बे कर्नाटक अन् लिंगायत समाजाने केला भाजपाचा खेळ खल्लास

author img

By

Published : May 14, 2023, 8:11 PM IST

भाजपाने स्थानिक प्रश्नांना बगल देत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, हे एक पराभवाचे मोठे कारण ठरले. त्याचप्रमाणे भाजपा स्थानिक लोकांच्या भावनांना ओळखण्यास यावेळी कमी पडली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लिंगायत समाजाने फिरवलेली पाठ. लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळावायचा असेल तर भाजपाला दक्षिण स्वारी जिंकावी लागणार आहे. दक्षिणेतील पाच राज्य आणि एक केंद्राशासित राज्य आहे, जेथे भाजपाची पकड नाही.

Bombay Karnataka and
बॉम्बे कर्नाटक

Karnataka Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. योग्य रणनीती आणि स्थानिक समस्यांची मेळ घालून काँग्रेसने विजयाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. कर्नाटक राज्यात भाजपाने काही चुका अशा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या हातात असलेले दक्षिणेतील एकमेव राज्य देखील गेले. दरम्यान, भाजप कर्नाटकात का पराभूत झाले याचे कारण सर्व बाजूने जाणून घेतले पाहिजे. याचमुळे आपण लिंगायत समाजाची राजकारणातील प्रभाव जाणून घेणार आहोत.

लिंगायत समाजाकडे दुर्लक्ष : या निवडणुकीत भाजपाने स्थानिक प्रश्नांना बगल देत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, हे एक पराभवाचे मोठे कारण ठरले. त्याचप्रमाणे भाजपा स्थानिक लोकांच्या भावनांना ओळखण्यास यावेळी कमी पडली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे लिंगायत समाजाने फिरवलेली पाठ. लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळावायचा असेल तर भाजपाला दक्षिण स्वारी जिंकावी लागणार आहे. दक्षिणेतील पाच राज्य आणि एक केंद्राशासित राज्य आहे, जेथे भाजपाची पकड नाही. या राज्यांमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी कर्नाटक राज्य हे भाजपासाठी एक दरवाजा होता. परंतु तेही आता हातातून गेले आहे. यामागील कारण म्हणजे लिंगायत समाजाकडे भाजपाचे झालेले दुर्लक्ष.

मुख्यमंत्री कोण बनेल : भाजपाने यावेळी अख्या प्रचार केला परंतु मुख्यमंत्री कोण असेल हे जाहीर केले नव्हते. लिंगायत समाजाच्या नेत्याऐवजी दुसरा कोणी नेता मुख्यमंत्री करणे भाजपाला हानीकारक ठरले असते. येडीयुरप्पा यांना हटवल्यानंतर 28 जुलै 2021ला बसवराज बोम्मई यांना भाजपाने मुख्यमंत्री पदावर बसवले होते. येडीयुरप्पा यांच्यानंतर बोम्मई हे लिंगायत समाजाचे भाजपमधील दुसरे मोठे नेते आहेत. शिग्गवा या मतदारसंघात बोम्मई यासारखा भाजपाकडे दुसरा कोणी दमदार नेता नव्हता. बोम्मई या मतदारसंघातून 2013, 2018 आणि आता 2023 रोजी निवडून येणारे नेते आहेत. पण भाजपाने मुख्यमंत्री कोण होणार हे घोषित न करता निवडणुकीला सामोरे जाणे योग्य समजले आणि त्याचा परिणाम भाजपाचा दारुण पराभव झाला.

नाराजीचा परिणाम : अजून एक उदाहरण येडीयुरप्पा यांचेच देता येईल. लिंगायत समाजाची नाराजी नको म्हणून भारतीय जनता पक्षाने 75 वर्षाच्या आणि त्यापेक्षा नेत्यांना मार्गदर्शक मंडळात नेमण्याचा निर्णय मोडीत काढत बी.एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवले होते. 2013 साली त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. त्यावेळी भाजपाला लिंगायत समाजाच्या नाराजीचा मोठा फटका बसला होता. कारण भाजपाचा व्होट बँक असलेला लिंगायत समाज दूर गेला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी येडीयुरप्पा यांनी परत भाजपात यावे ही विनंती केली होती. यावेळी भाजप पुन्हा एकदा लिंगायत समाजातील मतदारांवर भरोसा ठेवला होता. मागील दोन दशकांमध्ये भाजपला मतदान केल्यास मुख्यमंत्री लिंगायत समाजाचाच होईल, याची खात्री लिंगायत समाजाला होती. मात्र, पक्षातील बलाढ्य नेते बी.एस. येडियुराप्पाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हते. यामुळे लिंगायत समाजाचे लोक भाजपावर नाराज होते. याशिवाय भाजपाने बी.एस येडीयुरप्पा यांना काही काळ मुख्य प्रवाहातून बाजूला केले होते, त्याचाही राग या समाजाच्या लोकांमध्ये होता.

वीरशैव लिंगायत फोरमचा काँग्रेसला पाठिंबा : वीरशैव लिंगायत समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. काँग्रेसने या समाजाचा विश्वास जिंकला होता. लिंगायत समाजाच्या सदस्यांना 30 आणि वोक्कालिंगा जमातीला 24 तिकीट दिले होते. त्याचबरोबर काँग्रेसने लिंगायत समाजाने वेगळ्या धर्माची मागणी 2018 मध्ये केली होती. त्यावेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता.

काय परिणाम होता : कर्नाटकातील लिंगायत समाजाचा इतिहास हा 12व्या शतकापासून सुरू होतो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारावर कर्नाटकची स्थापना झाली आहे. राज्याची स्थापना झाल्यापासूनच कर्नाटकातील राजकारणावर लिंगायत समाजाचा दबदबा आहे. कर्नाटकात जवळपास 18 टक्के लोक हे लिंगायत समाजाचे आहेत. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज प्रभावशाली आहे. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी किंवा बहुमत आणण्यासाठी लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरतात.

लिंगायत जहाँ खडे होते सरकार वही होती है : लिंगायत समाज ज्या पक्षाच्या बाजूने आहे, त्या पक्षाला जास्त जागा मिळतात. लिंगायत समाजाचे मोठे नेत्यांना संधी न दिल्याने हा समाजा भाजपावर नाराज होता. दोन टक्के आरक्षण देऊन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्या भागामध्ये रॅली घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.

निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावते मुंबई-कर्नाटक : सत्तेत कोणत्या पक्षाला बसावायचे याखेळात यासाठी मुंबई-कर्नाटकात अर्थात (कित्तूर-कर्नाटक) महत्त्वाची भूमिका निभावत असतात. यात विभागात सहा जिल्हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यात बेलगाव, धारवाड, विजापूर,हावेरी, गदग आणि बागलकोट या जिल्ह्याचा समावेश होतो. दरम्यान हे भाग महाराष्ट्र राज्याच्या आसपास आहेत. ही स्थिती लक्षात घेत भाजपाने येथे महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यानाथ आणि शिवराज चौहान यांना प्रचारासाठी उतरवले होते. पण या भागातील इतिहास कदाचित भाजपाच्या लक्षात राहिला नसावा, यामुळे या भागातून जे 30 जागांची लीड येणार होती ती लीड भाजपाला मिळाली नाही. यात जिल्ह्यांमध्ये साधारण 50 जागा आहेत. तर व विधानसभा सदस्यसंस्खेच्या तुलनेत सुमारे 22 टक्के आहेत.

असे आहे गणित : या विभागात येणाऱ्य़ा जिल्ह्यात एकूण ५० जागा आहेत. त्या २२४ विधानसभा सदस्यसंख्येच्या तुलनेत सुमारे २२ टक्के आहेत. पण या भागातील मतदार नेहमी सत्ता बदलण्याच्या ट्रेंडवर विश्वास ठेवून असतात. दरम्यान २००४, २००८ व २०१८ च्या निवडणुकीत उत्तर कर्नाटकात भाजपला घवघवीत यश मिळाले होते. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ५० पैकी ३० जागा भाजपाला मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला १७ व जेडीयुला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर २०१३ मध्ये हा विभाग काँग्रेस पक्षासोबत राहिला. त्यावेळी काँग्रेसला 50 जागांमधून 30 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला 15 जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएसला एक सीट मिळाली होती. इतर पक्षांना फक्त 4 जागा मिळाल्या होत्या.

असा होता भाजपाचा प्लान : या भागात लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. बी.एस. येडीयुरप्पा ही याच समाजाचे नेते आहेत. भाजप याचा फायदा घेणार होते. कारण बी. एस येडीयुरप्पा यांनी 2008 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला होता. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. भाजप या भागातील 50 पैकी 30 जागांवर विजय मिळवू पाहत होती, पण तसे झाले नाही. भाजपाचा डोळा असलेल्या संख्येवर काँग्रेसने कब्जा केला. आणि भाजपाच्या पारड्यात फक्त 16 जागा जाऊ दिल्या. याचा कारण येडीयुरप्पा यांचे महत्त्व कमी केल्यामुळे तसेच शेट्टार देखील मुंबई-कर्नाटक या भागातील आहेत. याचाही परिणाम भाजपाच्या मतांवर झाला. बी.एस.येडियुरप्पा यांच्या प्रमाणेच जगदीश शेट्टर या समाजाचे मोठे नेते मानले जातात. जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपला नुकसान झाले.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.