पश्चिमी चंपारण (बिहार) : बिहार मधील पश्चिम चंपारण येथील गंडक नदीत नाव बुडाल्याची घटना ( Boat capsizes in west champaran ) घडली आहे. नदी ओलांडून शेतीच्या कामासाठी मजूर होऊन जाणारी नाव पलटी झाली आहे. यात 24 जण बुडाल्या शक्यता ( 24 People feared Drowned ) वर्तवण्यात येत आहे. तर आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
ऊस कापणीसाठी जात होते मजूर -
मिळालेल्या माहितीनुसार, नावेवर टॅक्टर घेऊन 24 मजूर हे ऊस कापणीसाठी जात होते. यावेळी अचानक नावेचे संतुलन गेल्यामुळे गंडक नदीत नाव बुडाली. घटनास्थळी एनडीआरएफची टीम पोहोचली असून शोधमोहीम सुरु आहे. ही घटना बेतिया-गोपालगंज या सिमा भागात भगवानपूर गावात झाली. सध्या, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी एसडीओ आणि एसडीपीओच्या टीम आल्या असून शोध मोहीम सुरू आहे.
हेही वाचा - Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाकडून अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने