ETV Bharat / bharat

Explosion in Zamra International Convention Centre : केरळच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, अनेक जखमी - kalamassery convention center

Explosion in Zamra International Convention Centre : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत तपास करण्याचे आदेश केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Explosion in Zamra International Convention Centre

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 11:56 AM IST

Updated : Oct 29, 2023, 2:13 PM IST

एर्नाकुलम Explosion in Zamra International Convention Centre : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झालाय. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक लोक उपस्थित होते. इथं ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्फोट होताच याठिकाणी आरडाओरडा झाला. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर स्फोटाचं कारण मात्र समजू शकलं नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

अचानक झाला मोठा स्फोट : मिळालेल्या माहितीनुसार, जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ख्रिश्चन बांधवाकडून तीन दिवसीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या प्रार्थना सभेचा शेवटचा दिवस होता. रविवारी सकाळी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर इथं गोंधळ उडाला. लोक इकडं तिकडं धावू लागले. याबाबत पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

  • It's a very unfortunate incident. We are collecting details regarding the incident. All top officials are there in Ernakulam. DGP is moving to the spot. We are taking it very seriously. I have spoken to DGP. We need to get more details after the investigation: Kerala CM Pinarayi… https://t.co/4utwtmR9Sl pic.twitter.com/GHwfwieRLB

    — ANI (@ANI) October 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्फोटात एकाचा मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या स्फोटात सुमारे 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रार्थना सभेसाठी सुमारे 2300 जणांनी नोंदणी केली असल्याचा अंदाज आहे. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेला हा कार्यक्रम आज संध्याकाळपर्यंत संपणार आहे. एर्नाकुलम पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, 'ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. सर्व वरिष्ठ अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेत आहोत. डीजीपीशी बोलल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Sivakasi Firecracker Blast : फटाक्यांचं शहर भीषण स्फोटांनी हादरलं! ११ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर
  2. Pimpri Chinchwad fire : गॅसचा काळाबाजार पडला महागात, वाचा पिंपरी-चिंचवडमध्ये स्फोट झाला तेव्हा नेमकं काय घडलं
  3. Bengal Cracker factory Blast : पश्चिम बंगालमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ ठार, अनेक जखमी

Last Updated : Oct 29, 2023, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.