पणजी - संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या गोव्यात भारतीय जनता पक्ष 20 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला ( Goa Election Result 2022 ) आहे. तर काँग्रेसचा प्रवास 11 जागांवर थांबला आहे. गोव्यात कॅथलिक राजकारण होते असे बोलले ( Christian Politics In Goa ) जाते, मात्र भाजपच्या विजयाने या चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम दिल्याचे भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Goa ) म्हणाले.
भाजपला 20 जागा मिळाल्या असून तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा दावा डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसला तीन आणि आम आदमी पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र गोव्याच्या राजकारणात साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा यात ख्रिश्चन मतदारांची संख्या 33 टक्के आहे. जवळपास 15 मतदारसंघ हे ख्रिश्चनबहुल आहेत. यात काँग्रेसने -5, भाजप - 4, आम आदमी पार्टीला - 2, गोवा फॉरवर्ड - 1 आणि इतर पक्षांना तीन जागांवर यश मिळाले आहे. यापैकी 10 उमेदवार हे ख्रिश्चन आहेत.
हे मतदारसंघ आहे ख्रिश्चनबहुल
12) ताळगाव - जेनिफर मोन्सेरात - भाजपा
34) कुंकोलिम - अँलीमा युरी (काँग्रेस)
28) नुवेम - अँलेक्सीओ सेक्युरा (काँग्रेस)
33) नेवालीम - उल्हास तुयेकर (भाजप)
08) कळंगुट - मायकल लोबो - काँग्रेस
14) सांत आंद्रे - विरेश बोरकर - आरजी
35) वेलीम - क्रूझ सिल्वा (आम आदमी पार्टी)
26) दाबोलिम - मौविन गुदीनो (भाजप)
13) सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस - काँग्रेस
27) कार्तालिम - अँतोनियो वास (अपक्ष)
37) कुडचडे - निलेश काबरा (भाजप)
32) बेनॉलिम - वेंझी वेगास (आम आदमी पार्टी)
06) शिवोली - डिलायल लोबो - काँग्रेस
30) फातोर्डा - विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
उत्तर गोव्यात भाजपला दहा जागांवर यश
भाजपने उत्तर गोव्यात दहा जागा जिंकल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पणजी मतदारसंघात अखेर बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे. भाजपच्या तिकीटावर लढलेल्या मोन्सेरात यांनी मात्र भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपले काम केले नसल्याचे मोन्सेरात म्हणाले. मोन्सेरात यांच्या विरोधात येथे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल अपक्ष निवडणूक लढवली. याशिवाय भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत देखील उत्तर गोव्यातून विजयी झाले आहेत. सांखली मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत डॉ. सावंत यांचा विजय झाला आहे. यासह भाजपचे आणखी आठ उमेदवार उत्तर गोव्यातून विजयी झाले आहेत.
उत्तर गोव्यात काँग्रेसला सहा जागांवर यश मिळाले आहे. त्यातील प्रामुख्याने कळंगुट मतदारसंघातील मायकल लोबो यांच्या यांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोबो यांच्यासह त्यांची पत्नी डिलायल लोबो या शिवोली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. हळदोणे येथून कार्लोस फरेरा, सांताक्रूझ येथून रुडॉल्फ फर्नांडिस विजयी झाले आहेत.
01) मांद्रे - जीत आरोलकर - मगोपा
02) पेडणे - प्रवीण आर्लेकर - भाजपा
03) डिचोली - डॉ. चंद्रकांत शेट्ये - अपक्ष
04) थिवी - निळकंठ हळर्णकर - भाजपा
05) म्हापसा - ज्योसुआ डिसोझा - भाजपा
06) शिवोली - डिलायल लोबो - काँग्रेस
07) साळगांव - केदार नाईक - काँग्रेस
*08) कळंगुट - मायकल लोबो - काँग्रेस
09) पर्वरी - रोहन खंवटे - भाजपा
10) हळदोणे - कार्लोस फेरेरा - काँग्रेस
11) पणजी - बाबूश उर्फ आतानासियो मोन्सेरात - भाजपा
*12) ताळगाव - जेनिफर मोन्सेरात - भाजपा
13) सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस - काँग्रेस
*14) सांत आंद्रे - विरेश बोरकर - आरजी
15) कुंभारजुवा - राजेश फळदेसाई - काँग्रेस
16) मये - प्रेमेंद्र शेट - भाजपा
17) सांखळी - डॉ. प्रमोद सावंत - भाजपा
18) पर्ये - देविया उर्फ दिव्या राणे - भाजपा
19) वाळपई - विश्वजित राणे - भाजपा
दक्षिण गोव्यात भाजपला दहा जागा
उत्तर गोव्या प्रमाणेच दक्षिण गोव्यातही भारतीय जनता पक्षाने दहा मतदारसंघांवर झेंडा फडकवला आहे. येथे काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. ख्रिश्चन मतांच्या जोरावर विजयी होण्याची काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची रणनिती या निवडणुकीत यशस्वी होताना दिसली नाही. काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करताना ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, भाजपचा विजय हा मत विभाजनामुळे झाला आहे. काँग्रेसची मते आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये विभागली गेली. त्यामुळे भाजपला यश मिळाले आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास भाजपला 33.3 टक्के मते मिळाली आहेत तर त्या खालोखाल काँग्रेसला 23.5 टक्के मते मिळाली. दुसरीकडे आप (6.77%) आणि तृणमूल (5.21%) या दोन्ही पक्षांना मिळालेली मते ही काँग्रेसची मते असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे. या मतविभागणीमुळे काँग्रेसची साधारण 12 टक्के मते कमी झाली असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
दक्षिण गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक आणि गोवा फॉरवर्ड यांनाही यश मिळाले आहे तर आपला दोन जागांवर यश मिळाले आहे.
20 ) प्रिओळ - गोविंद गौडे (भाजप)
21) फोंडा - रवी नाईक (भाजप)
22) शिरोडा - सुभाष शिरोडकर (भाजप)
23) मरकेम - रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष)
24) मुरमॉगाव - संकल्प अमोनकर (काँग्रेस)
25) वास्को द गामा - कृष्णा सालकर (भाजप)
*26) दाबोलिम - मौविन गुदीनो (भाजप)
*27) कार्तालिम - अँतोनियो वास (अपक्ष)
28) नुवेम - अँलेक्सीओ सेक्युरा (काँग्रेस)
29) कुर्तारिम : अँलेक्सीओ रेजिनाल्डो लौरेको (अपक्ष)
*30) फातोर्डा - विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
31) मडगाव - दिगंबर कामत (काँग्रेस)
*32) बेनॉलिम - वेंझी वेगास (आम आदमी पार्टी)
*33) नेवालीम - उल्हास तुयेकर (भाजप)
*34) कुंकोलिम - अँलीमा युरी (काँग्रेस)
*35) वेलीम - क्रूझ सिल्वा (आम आदमी पार्टी)
36) केपे - अल्टोन डीकोस्टा (काँग्रेस)
*37) कुडचडे - निलेश काबरा (भाजप)
38) सावर्डे - गणेश गावकर (भाजप)
39) सांगे - सुभाष फळ देसाई (भाजप)
40) काणकोण - रमेश तवडकर (भाजप)