हैदराबाद Venkata Ramana Reddy : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निकालानंतर स्पष्ट झालं की, के. चंद्रशेखर राव आता माजी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. या निवडणुकीत केसीआर दोन जागांवरून लढत होते. त्यापैकी कामारेड्डी मतदारसंघ अधिक चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे येथून काँग्रेस पक्षाचे संभाव्य मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी देखील मैदानात होते.
तिसराच उमेदवार विजयी ठरला : मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, हे दोन्ही दिग्गज नेते या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. येथे तिसराच उमेदवार विजयी ठरला! कामारेड्डी मतदारसंघात भाजपाचे वेंकट रमना रेड्डी जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा ५,१५६ मतांच्या फरकानं पराभव केला. तर काँग्रेसचे रेवंत रेड्डी तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेलेत.
व्यंकट रमण रेड्डी विजयी : सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून येथे अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला भाजपाचे वेंकट रमना रेड्डी यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर रेवंत रेड्डी पुढे गेले. मुख्यमंत्री केसीआरही काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र मतमोजणी संपली तेव्हा व्यंकट रमण रेड्डी नाट्यमय पद्धतीनं विजयी झाले. ते येथील स्थानिक नेते आहेत. केसीआर हे मेडक जिल्ह्यातील आहेत, तर रेवंत रेड्डी हे महबूबनगर जिल्ह्यातून येतात.
दुसऱ्या जागेवर विजय मिळवला : या मतदारसंघात पराभव झाला तरी, केसीआर आणि रेवंत रेड्डी यांनी अनुक्रमे गजवेल आणि कोडंगल या त्यांच्या घरच्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. केसीआर हे गजवेलमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आले, तर रेवंत रेड्डी कोडंगलमधून विजयी झाले. २०१८ मध्ये त्यांना या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा :