ETV Bharat / bharat

26/11 Attack : काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते; मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकात मनमोहन सरकारवर टीका

author img

By

Published : Nov 23, 2021, 1:53 PM IST

Updated : Nov 23, 2021, 6:42 PM IST

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकात मुंबईतील 26/11च्या हल्ल्यावरुन काँग्रेसला घेरलेले दिसत आहे. (mumbai 26/11 attack) जर कोणत्या देशाला (पाकिस्तान) निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी पश्चात्ताप होत नसेल तर अशावेळी संयम ही ताकद नव्हे तर कमकुवत पणाचे लक्षण आहे. ते पुढे लिहितात की, त्यांनी या हल्ल्याची तुलना 9/11 शी करताना लिहिले की, शब्दांपेक्षा जास्त वेगाने प्रत्युत्तर देणे महत्त्वाचे होते, असे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले. (manish tiwari book on 26/11 mumbai attack)

bjp targets congress over manish tiwaris book
काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते; मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकात मनमोहन सरकारवर टीका

नवी दिल्ली - काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून पुस्तकांमुळे संकटात सापडत असल्याचे समोर आले आहे. आधी कांग्रेस नेते सलमान खुर्शीदने त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाला घेऊन केलेल्या भाष्यानंतर आता काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकात मुंबईतील 26/11च्या हल्ल्यावरुन काँग्रेसला घेरलेले दिसत आहे. (mumbai 26/11 attack)

आपल्या पुस्तकात काय म्हणाले मनीष तिवारी?

26/11च्या वेळी युपीए सरकारला जे पाऊले उचलायला हवे होती, त्या त्यांनी उचलली नाहीत. यानंतर लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज होती. जर कोणत्या देशाला (पाकिस्तान) निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी पश्चात्ताप होत नसेल तर अशावेळी संयम ही ताकद नव्हे तर कमकुवत पणाचे लक्षण आहे. ते पुढे लिहितात की, त्यांनी या हल्ल्याची तुलना 9/11 शी करताना लिहिले की, शब्दांपेक्षा जास्त वेगाने प्रत्युत्तर देणे महत्त्वाचे होते. (manish tiwari book on 26/11 mumbai attack) मनीष तिवारी यांच्या पुस्तकाचे नाव 10 FLASHPOINTS; 20 YEARS असे आहे.

हेही वाचा - CBI Joint Director : महाराष्ट्रकन्या विद्या कुलकर्णींची सीबीआयच्या सहसंचालकपदी निवड

याप्रकरणावर भाजप काय म्हणाले?

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या पुस्तकात दिलेल्या तथ्यानंतर हे स्पष्ट झाले आहे, की, काँग्रेसचे सरकार काहीच कामाचे नव्हते. ते म्हणाले, 'या पुस्तकाचा सारांश हा आहे की, 26/11च्या वेळी संयम ही ताकद नव्हे तर कमकुवत पणाचे लक्षण आहे. भारताला त्यावेळी कडक कारवाई करायला हवी होती. आज काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी स्वीकारले आहे की, त्यांच्या काँग्रेस सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पणाला लावला होता. भारताच्या वीर सेनेला केंद्र सरकारने त्यावेळी खुले अधिकार का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी सोनिया गांधी यांना केला.

हेही वाचा - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे राजकीय वादंग; हिंदुत्वाविरुध्द केले हे वक्तव्य..

Last Updated : Nov 23, 2021, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.