ETV Bharat / bharat

गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर - Cow urine

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच तुम्ही गोमूत्र प्या आणि गो पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर
प्रज्ञासिंह ठाकूर
author img

By

Published : May 17, 2021, 6:00 PM IST

भोपाळ - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच तुम्ही गोमूत्र प्या आणि गो पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांचे संबोधन...

गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसात झालेला संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं पिते, त्यामुळेच मला कधी कोणती औषधे घ्यावी लागत नाहीत. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर देशी गाय पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसेच एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितले. संत नगरमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी लोकांना खबरदारी घेण्याचे आणि सरकारकडून जारी केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध -

साध्वी भोपाळच्या सीहोर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघाला भेट दिली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. काही नागरिकांनी त्या बेपत्ता असल्याची पोस्टर्स शहरात लावली होती. याचबरोबर कोरोनासंदर्भात त्यांनी एक अजब विधान यापूर्वीही केले होते. हनुमान चालीसाचा पाठ केल्यानं कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. (दरम्यान खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या कोणत्याही दाव्यांची पुष्टी ईटीव्ही भारत करत नाही)

हेही वाचा - प्रज्ञासिंह यांचे पुन्हा नथूराम गोडसे प्रेम.. संबोधले 'देशभक्त', लोकसभेत गदारोळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.